Sunday, December 22, 2024
Homeराज्यनांदेड जिल्हा पोलीस दलाचा सीसीटीएनएस कामगिरीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक...

नांदेड जिल्हा पोलीस दलाचा सीसीटीएनएस कामगिरीमध्ये राज्यात प्रथम क्रमांक…

नांदेड – महेंद्र गायकवाड

अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कडुन पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरी बाबतचा आढावा दर महीन्यात घेण्यात येतो राज्यातील सर्व घटकांचे माहे ऑगस्ट 2022 मधील सीसीटीएनएस मासिक कामगिरी अहवालांचे अवलोकन करुन देण्यात आलेल्या गुणांकनानुसार नांदेड जिल्हयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये नांदेड जिल्यातील 36 पोलीस स्टेशन येथे दाखल होणारे प्रथमखबर, घटनास्थळ पंचनामे, आरोपी अटक, मालमत्ता जप्ती, दोषारोप पत्र, न्यायालयीन निकाल, हरवलेले इसम, अनओळखी मयत, अदखलपात्र खबर, गहाळ / बेवारस मालमत्ता, प्रतीबंधक कार्यवाही व ईतर नोंदी अश्या एकुण 18 प्रकारच्या माहितीची सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये मध्ये नोंदी करण्यात येतात.

तसेच सीसीटीएनएस प्रणालीचा दैनदिन कामकाजात वापर करुन गुन्हे प्रतिबंध, गुन्हे उघडकीस आणुन चांगली कामगिरी करण्यात आली तसेच ITSSO, ICJS व Citizan Portal वरील e-Complaint, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव यांची ऑनलाईन अर्जाची वेळेत निर्गती व प्रभावीपणे वापर केल्याने माहे ऑगस्ट 2022 मध्ये नांदेड जिल्हयाने 242 गुणांपैकी 237 गुण मिळवुन महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस नोडल अधिकारी अपर पोलीस अधीक्षक नांदेड निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक भोकर विजय कबाडे व त्यांची सीसीटीएनएस टीम पोलीस उप निरीक्षक रहिम बशीर चौधरी, पोलीस उप निरीक्षक प्रणिता बाभळे,

पोलीस नाईक समीरखान मुनीरखान पठाण, पोलीस नाईक ओंकार सुरेश पुरी, पोलीस कॉन्स्टेबल माधव नारायण येईलवाड यांचे अथक परिश्रमामुळेच नांदेड पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. पोलीस अधिक्षक यांनी भविष्यातही अशाच कामगिरी अपेक्षा व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: