नांदेड – महेंद्र गायकवाड
सध्या ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकारात वाढ झाली असून पोलिसाकडून वारंवार नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सूचना व आवाहन करूनही अनेक जण फसत आहेत नागरिकांनी फसव्या बँक मॅसेज पासून सावध राहावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नागरिकांना केले आहे.
शहरातील आनंद नगर येथील मुंजाजी प्रकाशराव डाढाळे यांना एक अनोळखी व्यक्तीने फोन करून सांगीतले की तुमच्या अँक्सीस बँक खात्याला लिंक असलेले पॅन कार्ड हे अपडेट करायचे आहे. पॅन कार्ड अपडेट केले नाही तर तुमचे बँक खाते बंद करण्यात येईल.
बँक खाते चालु ठेवायचे असेल तर तुमच्या मोबाईलवर आलेला ओ.टी.पी.सांगा.तेव्हा डाढाले यांनी आलेला ओ.टी.पी. अनोळखी व्यक्तीला सांगीतला असता त्वरित त्यांच्या बँक खात्यातील 80500 रु. कपात झाल्याचे मेसेज आल्याने डाढाळे यांना लक्षात आले की आपल्याला कोणीतरी फसवले आहे.
त्यामुळे त्यांनी विमानतळ पोलीस स्टेशन व सायबर पोलीस स्टेशन, नांदेड येथे तक्रार दाखल केली. सदर तक्रारी वरून सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथील अधिकारी व अंमलदार यांनी, फिर्यादी यांच्याकडून घडलेल्या घटनेबाबत सर्व माहिती घेतली व तात्काळ संबधित बँका आणि wallet (वॉलेट )यांचे नोडल अधिकारी यांना ईमेलद्वारे संपर्क साधला.
त्यावरून संबंधित बँका आणि wallet यांनी तात्काळ कारवाई केली. सदर कारवाईच्या अनुषंगाने संबधित बँकासोबत आणि wallet सोबत वेळोवेळी पाठपुरावा करून तक्रारदार यांना फसवणूक झालेली पुर्ण रक्कम 80,500 /- रूपये त्यांच्या खात्यात परत मिळाली. त्यामुळे तक्रारदार यांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे आभार मानले.
सदरची कार्यावाही पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे व अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन येथील पोनि चिंचोळकर, पोउपनि दळवी, व पोलिस अंमलदार यांनी पार पाडली.