नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड – शहरात वाढत असलेल्या वाहतूक समस्या दुर करण्यासाठी व बेशिस्त व वाहतूकीचे नियम मोडणा-या वाहन चालकावर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी वेळोवळी शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांना आदेशित केले होते.
वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे शहर वाहतूक शाखा वाजिराबादचे पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे यांनी शहरात वाहतूकीचे नियम मोडणा-या 13014 वाहन चालकावर कारवाई करुन त्यांचेकडून 1,39,82400/-रु (एक कोटी एकोणचाळीस लाख ब्याऐंशी हजार चारशे रुपय) दंड केला.
शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांनी लोकसभा निवडणुक-2024 अनुषंगाने नांदेड शहरात VVIP प्रचार सभा बंदोबस्त, निवडणुक बंदोबस्त, तसेच रमजान ईद, श्री रामनवमी, डॉ. बाबासाहेच आंबेडकर जयंती महत्वाचे बंदोबस्त करीत असतांना दि. 12 मार्च 2024 ते दि. 5 जून 2024 या कालावधीतशहरात वाहतूकीचे नियम मोडणा-या वाहनधारकावर कारवाई करुन त्यांच्यावर एकूण 13014 केसेस करण्यात आल्या असून 1.39.82400/-रु (एक कोटी एकोनचाळीस लाख बायंशी हजार चारशे रुपय) दंड करण्यात आला.
त्यापैकी 3343 वाहनधारकाकडून 18,45,950/-रु (आठरा लाख पंचेचाळीस हजार नऊसे पन्नास रुपय) दंड वसूल करण्यात असून शासनास भरणा करण्यात आलेला आहे.
वाहतूक नियमांचे पालन करुन नांदेड ट्रॉफीक मुक्त करा असे आवाहन नांदेड शहर वाहतूक शाखेकडून नांदेडकरांना करण्यात आले आहे. यापुढे वाहतूकीचे नियम मोडणा-या वाहनधारकाविरुध्द कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा ईशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.