महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेड जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांची बदली नागपूर येथें झाली असून त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी नागपूर या पदावर करण्यात आल्याचे आदेश दिनांक 18 ऑगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय मुंबई यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर सध्याचा कार्यभार विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असे आदेश अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी दिले होते.
त्यानुसार दिनांक 18 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी नागपूर येथे बदली झाली कारणाने जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन जिल्हाधिकारी कोण येईल याची प्रतीक्षा नांदेडकर करित आहेत.