महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेड – लोहा तालुक्यातील मौजे वाका येथील गोपीराज हंबर्डे याने एका किराणा दुकानातून दारू विकत घेतल्यानंतर दारू पिण्यावरून दुकान चालक व त्याच्या वाद झाला त्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याने गोपीराजला सर्व लोकासमोर मारहाणीमुळे अपमान व बेईजती झाले कारणाने त्याने आरोपीने दिलेल्या त्रासाला कंटाळून दारुसोबत विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित आरोपी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत केल्या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल् करण्यात आला आहे.
लोहा तालुक्यातील मौजे.वाका येथे 28 ऑगस्ट रोजी गोपीराज भोजु हंबर्डे, वय 28 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. वाका ता. लोहा जि. नांदेड यांनी आरोपीचे किराणा दुकाना वरून देशी दारू विकत घेवुन आरोपीचे दुकाना समोरच बसुन दारू पिऊ लागल्याने आरोपीने त्यास दारू पिण्यास विरोध केला असता वाद होवुन मयतास आरोपीने लोकासमोर थापडा, बुक्याने लाथाने मारहाण केली तेव्हा त्याच्या पत्नीने भांडणे सोडुन पतीस घरी घेऊन गेले असता मयत यास दोन्ही आरोपीतांनी संगणमत करून लोकांसमोर मारहाण करून मयताचा अपमान केला,
बेईजती केल्यामुळे मी तर मरेन किंवा मारणाऱ्याला तरी मारेन म्हणुन घरून निघुन गेला व दारू व डोक्यातील उवा मारण्याचे विषारी औषध आणुन स्वतःचे घरा समोर आला व मारहाणीमुळे झालेला अपमान व बेईजतीमुळे नमुद दोन्ही आरोपीचे त्रासाला कंटाळुन दारू व उवा मारण्याचे विषारी औषध पिल्यामुळे त्यास उपचार कामी सरकारी दवाखाना विष्णुपूरी येथे दाखल केले असता उपचारा दरम्यान मरण पावला. यातील नमुद आरोपीतांनी त्यास आत्महत्येस प्रवृत केले असल्याची फिर्याद मयताची पत्नी शिलाबाई भ्र. गोपीराज हंबर्डे, वय 22 वर्षे, व्यवसाय शेती व शेतमजुरी यांनी दिली.
त्यांच्या फिर्यादवरुन पोस्टे उस्माननगर येथे गुरन 148/2022 कलम 306,34 भादवि कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोउपनि श्री पल्लेवाड, हे करीत आहेत.