महाराष्ट्र शासनाचा नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळ ग्रस्त गावामध्ये शेतकऱ्यांना अंत्यत लाभदायक ठरलेला आहे. महाराष्ट्रातील अल्पभुधारक शेक-यांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पचा कालावधी वाढविण्यात यावा.
यासाठी भुमिहीन शेतमजुरांना शेळीपालन व अल्पभुधारक शेतक-यांसाठी ताडपत्री, मोटार पंप 5 ते 10 HP पर्यंत, पी.व्ही.सी पाईप, कुंपन, वैयक्तीक गोडाऊन व कृषी अवजारे बँक. डिझेल पंप, सौर पंप. विहीर, बोअरवेल, कांदाचाळ, कडबा कटर, टोकणयंत्र . फवारणी यंत्र, सेंद्रीय शेती करण्यास अनुदान, मिनी दालमिल, सोयाबीन चाळणी यंत्र, मळणी यंत्र, मलचिंग पेपर. इत्यादी घटकांचा समावेश करण्यात यावा. तसेच भारत सरकारने शेतक-यांच्या उत्पन्न वाढविण्यावर लक्ष केंद्रित केलेले असुन.
यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (POCRA) योजनेअंतर्गत विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळ ग्रस्त जिल्हे यांमध्ये प्रकल्प (POCRA) नसलेल्या गावांचा समावेश करण्यात यावा. यासाठी अकोला जिल्हा कृषी पदवीधर/पदविकाधारक संघर्ष समिती अकोला जिल्हा अध्यक्ष स्वप्निल रामेश्वर गणेशपुरे, सचिव केशव चतरकर, अक्षय गावंडे, अजय सोनोने, अर्जुन शेरेकर ,विजय राठोड ,
अविनाश घुगे, मुर्तिजापूर कृषी विभागातील समुह सहाय्यक श्रीकांत डोईफोडे, राहुल वाडेवाले ,प्रतिक बढे, संदीप लांबाडे ,वैभव डोंगरे, कुलदीप थोरात,सागर गावंडे यांसह अकोला जिल्हा कृषी पदविका/ पदवीधर संघर्ष समितीचे सदस्य यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प महाराष्ट्र राज्याचे प्रकल्प संचालक मा.डॉ. परिमल सिंह ,डॉ कांतप्पा खोत उपविभागीय कृषी अधिकारी अकोला, अमृता काळे तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर , यांना निवेदन देण्यात आले.