Monday, December 23, 2024
Homeराज्यमुलकीपड जमिनीच्या सातबारा पत्रकी कमी झालेली नावे लावा, नेर्लीतील हरिजन समाजाचे मागणीसाठी...

मुलकीपड जमिनीच्या सातबारा पत्रकी कमी झालेली नावे लावा, नेर्लीतील हरिजन समाजाचे मागणीसाठी उपोषण…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

नेर्ली (ता. करवीर) येथील हरिजन बौद्ध समाजाची गट क्रमांक १९४ मधील दोन हेक्टर ६८ आर जमिनीवरील आप्पाजी नाना कांबळे व २५ हरिजन यांची कमी झालेली नावे पुन्हा सातबारा पत्रकी लावावीत यासाठी नेर्ली येथील सर्वे नंबर १९४ येथील माळावर राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलकी पड संघर्ष समिती व समस्त बौद्ध समाजातील नागरिकांचे उपोषण सुरू असून सदर उपोषणास करवीर चे नायब तहसीलदार बिपिन लोकरे, मंडल अधिकारी दीपक पिंगळे यांनी भेट देऊन आंदोलकांच्या मागण्यांबाबत उद्यापर्यंत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. परंतु लेखी आश्वासन मिळाले की उपोषण संगीत न करण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार नेर्ली गावातील गट क्रमांक १९४ यातील दोन हेक्टर ६८ आर जमीन १९४१ ते ५० च्या पत्रकाच्या आधारे करवीर संस्थांचे राजे छत्रपती मन महाराज यांचे नावे दिसून येते. पुरा लेखागार विभागाच्या कागदपत्रानुसार मुलकीपड, हरिजन व मुलकीपड व रिक्रुट लोकांना वाटप केलेली जमीन अशी नोंद आहे. संस्थान खालसा नंतर सदर जमीन सरकार हक्कात दाखल करून घेतली होती.

१९६१ च्या मामलेदार यांच्या हुकूमाने आप्पाजी नाना कांबळे कुशप्पा सोरटे, जिन्नाप्पा कांबळे, पिरा ढाले वगैरे २५ समस्त हरिजन यांनी कब्जा हक्काची रक्कम ४७३ रुपये २५ आणे कर भरून सदर जमिनी मिळवल्या होत्या. परंतु मूळ खातेदार आप्पाजी नाना कांबळे वगैरे २५ समस्त हरिजन यांचे प्रत्यक्ष सातबारा पत्रकी नावे नोंद होण्यासाठी तलाठी व मंडल अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे विलंब झाला. तसेच खरीप हंगामातील भुईमूडीत अशा पीक पाण्याऐवजी खणपड व पडसर अशी चुकीची नोंद झाली.

दरम्यान जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दहा वर्ष मुदतीवर जय भवानी सहकारी संस्था शासन नगर कोल्हापूर यांना एक हेक्टर २१.४१ क्षेत्र उत्खननासाठी दिली होती. परंतु नंतर हा खानपट्टीचा आदेश रद्द करण्यात आला. मात्र जुना गट क्रमांक १७९ असलेल्या सातबारा पत्रकी इतर अधिकृत नोंद कमी झाली नसल्यामुळे पीक पाण्याची नोंद झाली नाही.

त्यामुळे मूळ २५ खातेदार यांची सातबारा पत्रके सातबारा पत्रकी नोंद झाली परंतु फेरफार क्रमांक २४० नुसार आप्पाजी नाना कांबळे वगैरे २५ त्यांचे मयत वारसदार प्रत्यक्ष वहिवाटदार यांची नावे गट क्रमांक १९४ मधून बेकायदेशीर त्या कमी करण्यात आले आहेत. सदरचा फेरफार रद्द करून पूर्व सात बारा पत्रकी नावे नोंद करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

तसेच या ठिकाणी रामचंद्र अण्णाप्पा पवार यांना काळा दगड उत्खननासाठी पाच वर्षे मुदतीने खनपट्ट्यांनी खणकर्मी जिल्हाधिकारी यांचे कडून आदेश घेऊन बेकायदेशीर उत्खनन केले आहे. सदर उत्खननास ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या विरोध केला असूनही या उत्खननास प्रशासनाकडून मुदतवाढ देण्यात आली केली असून सदर खानपट्ट्यासाठी देण्यात आलेल्या आदेशाची मुदत १० ऑगस्ट २२ रोजी संपुष्टात आल्याने रामचंद्र पवार यांचे इतर हक्क अधिकारातील नाव कमी करण्यात यावे व त्यांच्या बेकायदेशीर उत्खनांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.

तसेच गट क्रमांक १९५अ, १९९ अ व २०१ अ वर झालेल्या बोगस खरेदी विक्रीची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सदर आंदोलन स्थळी सरपंच प्रकाश पाटील व पदाधिकारी तसेच रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा नेते विश्वास तरटे कार्यकर्ते यांनी भेट देऊन बौद्ध समाजास आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी बौद्ध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपोषणासाठी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: