Monday, December 23, 2024
Homeराजकीयनागपूर जिल्हा परिषद प्रशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत समृद्धी पॅनलची प्रचारात आघाडी...

नागपूर जिल्हा परिषद प्रशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत समृद्धी पॅनलची प्रचारात आघाडी…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर जिल्हा परिषद प्रशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या २१ संचालक मंडळाची निवडणूक येत्या १६ एप्रिल रोजी होणार आहे. सरपंच भवन येथे मुख्यालय असलेल्या व २० कोटीची वार्षिक उलाढाल असलेल्या या पतसंस्थेच्या ताब्यासाठी एकूण ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. संस्थेचे एकूण ११७५ सभासद संख्या आहे. या पतसंस्थेचे कार्यक्षेत्र दोन लोकसभा मतदार संघ आहे. नागपूर व रामटेक या दोन लोकसभा मतदार संघात सभासद कार्यरत आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व पशू दवाखाने या मध्ये सभासद कार्यरत आहेत.या पूर्वी सन २०१५ मध्ये निवडणूक झाली होती. सात वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. समृद्धी पॅनल “विमान” हे निवडणूक चिन्ह घेऊन मतदारांसमोर आहे. समृद्धी पॅनलचे संयोजक व उमेदवारांनी संपूर्ण नागपूर जिल्हा प्रचारसभेने पिंजून काढला असून प्रचारात आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार प्रणित), कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद लेखा वर्गीय संघटना, शिक्षण विस्तार अधिकारी संघटना, पशूचिकित्सा व्यवसायी संघटना, जिल्हा परिषद लिपिकवर्गिय संघटना आदी संघटना मिळून समृद्धी पॅनल स्थापन केले. समृद्धी पॅनलचे संजय सिंग, अरविंद अंतूरकर, सुदाम पांगुळ व डॉ. सोहन चवरे हे संयोजक असून पतसंस्थेचे माजी सचिव किशोर इंदूरकर हे मार्गदर्शक आहेत.

या निवडणुकीत समृद्धी पॅनलने जे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले आहेत त्यामध्ये समृद्धी पॅनलचे संयोजक डॉ. सोहन चवरे, विजय कोकोडे, राजेश गोडे, योगेश राठोड, कल्पना खुडसंगे, हेमलता सूरजुसे, सुजित अढाऊ, जयंत दंढारे, विजय बुर्रेवर, महेश राऊत, अरुण काळे, कमल वसू, वंदना आरोडे, डॉ. रमेश गोरले, प्रशांत कुंटे, संतोष जगताप, हेमंत मुडानकर, सुभाष पडोळे, राहुल देशमुख, योगेश हरडे, उमेश जायेभाये यांचा समावेश आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: