मनसर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन विद्यापीठ…
नागपूर – शरद नागदेवे
मनसर येथील प्राचीन बुद्ध विश्व विद्यापीठ याठिकाणी दान पारमिता फाउंडेशन तर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, ह्या कार्यशाळेत नागपूर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी मधील ५० अभ्यासक उपस्थित होते, कार्यशाळेस आलेल्या अभ्यासकानी ह्या प्राचीन स्तूपाची माहिती घेऊन बुद्ध कालीन स्थापत्य कलेचा सर्व इतिहास जाणून घेतला, हे सर्व अभ्यासक अगोदर धंमलिपि शिकले व त्यानंतर मनसर येथे कार्यशाळेचे आयोजन करून ह्या कार्यशाळेस उपस्थित झाले,
सकाळी नागपूर वरून ११ वाजता मनसर विद्यापीठ लेणींकडे जाण्यासाठी तयार झालो एकूण ५० महिला भगिनी व बांधव कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या, कधीही एकमेकांना न भेटलेल्या नागपूर मधील अनेक धम्म भगिनी आज एकत्रितपणे अभ्यासदौऱ्यात सहभागी झाल्या होत्या,
सर्वप्रथम नागपूर विद्यापीठातील पुरातत्व विभागातील प्रो डॉ प्रियदर्शी खोब्रागडे , डॉ.लेले हाँग (चायना) दान पारमिता फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील खरे यांचा सत्कार करण्यात आला,
यानंतर निर्झरा रामटेके यांनी बनवलेले असाईनमेंट डॉ लेले हाँग यांना भेट देण्यात आले,
यावेळी नागपूर, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, मधील अभ्यासकांना कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी डॉ प्रियदशी खोब्रागडे सर आले होते
सम्राट अशोक कालीन स्तूप बघून तेथे विटा, शून्यागार, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी असलेल्या वर्ग खोल्या , ह्या सर्वांचा अभ्यास केला,मनसरच्या प्राचीन सम्राट अशोककालीन , सम्राट सातवाहनकालीन , वाकटककालीन स्तूप , चैत्यगृह , राजप्रसाद , महाविहार महाराष्ट्रातील सर्वात मोठे प्राचीन विद्यापीठ यांची माहिती मिळाली त्याचप्रमाणे प्राचीन बौध्द संस्कृतीच्या २७०० वरील अवशेष उत्खननात प्राप्त झालेत. यावरून प्राचीन मनसर हे बौध्द संस्कृतीचे धम्मकेंद्र हेच सिद्ध होते,
मागे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई यांनी मनसर येथे प्राचीन बौध्द विद्यापीठ होते याचा उल्लेख केलेला होता. हे विद्यापीठ नालंदा विद्यापीठा सारखेच गाजलेले असावे असे दिल्लीचे पुरातत्व विभागाचे इंजिनिअर मि. लाल यांनी मत व्यक्त केलेले आहे. मनसर हे प्राचीन बौध्द धम्मकेंद्र सम्राट अशोक काळापासून इसवीसनाच्या सहाव्या शतकापर्यंत एकूण नऊशे वर्ष होते असे संशोधकाचे मत आहे .
हे नालंदाच्या विश्व विद्यापीठाच्या समकालीन विद्यापीठ होते असे अनेक संशोधकांनी मत मांडले आहे,
दुपारच्या सत्रात स्नेहभोजन झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांना धम्मलिपि ग्रहण केल्याचे प्रमाणपत्राचे वितरण निशुल्क रित्या करण्यात आले, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे धम्मलिपि मध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली, परीक्षा झाल्यावर धम्मलिपिचे वर्णमाला सेट सर्व सहभागी अभ्यासकांना दान पारमिता फाउंडेशन तर्फे वितरित करण्यात आले,
ह्यावेळी डॉ लेले हाँग (चायना) ह्या प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या व तसेच नागपूर मधील धम्मलिपि शिक्षिका निर्झरा रामटेके, अलका गवई, तेजल नंदेश्वर , वंदना ओरके, नेहा राऊत यादव, करुणा गोडबोले ,प्रीती रामटेके, अपेक्षा अमीन दिवाण, सचिन म्हस्के, सरोज माटे इंदू सोमकुवर, सीमा थुल ,कैलास सहारे,नम्रता मेश्राम, वर्षार्थी इंदूरकर, दिलीप वासनिक, प्रवीण पवार, दिशा गायकवाड, रीना खोब्रागडे, विजय धांडे, मयंक अंबादे, युवराज बर्वे, सुनंदा साबळे, शील गजभिये, मधुमती कांबळे, नीलिमा पाटील इत्यादी कार्यशाळेस उपस्थित होते.