नागपूरात ब्रॉडगेज मेट्रोचे स्वप्न साकार होणार आहे, याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषण केली असून यासाठी कालच ऑर्डर बुक केली असल्याचे विदर्भ इंडस्ट्री असोसिएशनच्या अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले. नागपुरातील मेट्रो ही आपल्या देशातील पहिली मेट्रो असेल, ती नागपूर ते अमरावती, नागपूर ते छिंदवाडा, नागपूर ते बैतुल, नागपूर ते गोंदिया, नागपूर ते वडसा, त्यानंतर नागपूर ते यवतमाळ आणि नागपूर ते रामटेक ठिकाणी धावणार आहे, त्याचा वेग ताशी 140 किलोमीटर असणार आहे.
आता नागपूर ते अमरावती जे फक्त अंतर ते एक तास, दहा मिनिटे आणि 15 मिनिटे आहे, यामध्ये बिझनेस क्लास असेल, या गाडीत एकूण 8 डबे असणार आहे, यातील चार डबे इकॉनॉमी क्लासचे असतील, प्रत्येकाच्या समोर टीव्ही असेल, एअर कंडिशन आहे, जी वेस्टर्न कंट्रीमध्ये आहे तशीच मेट्रो असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला नाश्ता, चहा आणि मिळेल.
या मेट्रोत विमानासारखी सेवा मिळणार आहे यामध्ये मुली पाणी, चहा सर्व्ह करतील. तर अवघ्या दीड वर्षात देशातील पहिली मेट्रो नागपुरात सुरू होईल आणि तिचं तिकीट राज्य परिवहनच्या तिकीटा इतकं असेल. गडकरी पुढे म्हणाले, MSE मध्ये आमच्यावर 30 कोटींचे कर्ज आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की जास्तीत जास्त तीन वर्षात त्याचे पैसे वसूल होतील. याचा फायदा विदर्भातील उद्योग-व्यवसाय जगताला नक्कीच मिळेल.