Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीनागपूर! जिल्हा परिषद मध्ये गुन्हा दाखल असलेल्या कंत्राटदारांची काढली बीले... ग्रामीण पाणीपुरवठा...

नागपूर! जिल्हा परिषद मध्ये गुन्हा दाखल असलेल्या कंत्राटदारांची काढली बीले… ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा प्रताप…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर जिल्हा परिषद नागपूर येथे सुरक्षा ठेव घोटाळा समोर आला होता.कंत्राटदारांनी सुरक्षा ठेवीच्या डीमांड ड्राप्टचे मुळ प्रमान पत्र (डीडी) काढून घेत त्या ठिकाणी झेरॉक्स ठेवली आहेत.त्यांचा कडे असलेले काम पुर्ण होण्यापूर्वीच सुरक्षा ठेवीची रक्कम काढून घेतली याप्रकरणी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग,लघु सिंचन विभागातील १० कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून दोन कर्मचाऱ्यांना सक्तीचा सेवानिवृत्तीचा नोटीस बजावण्यात आली आहे.

१५ कंत्राटदारांचा विरोधात सझर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हाही दाखल करण्यात आलेल्या कंत्राटदारांचा कामाची गुणवत्ता तपासुन त्याची कामे रद्द करण्यात यावे तसेच त्यांची कामे इतरांन कडुन करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दीले होते.पण या आदेशाला न जुमाजता संबंधित कंत्राटदारांकडून कामे पुर्ण करण्यात आली.व त्यांची केलेल्या कामांची बीलेही काढण्याची बाब सोमोर आली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: