Sunday, December 22, 2024
Homeराज्यनागपूर | निसर्गराजा फाउंडेशनतर्फे मनीष नगर भागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…

नागपूर | निसर्गराजा फाउंडेशनतर्फे मनीष नगर भागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर :- निसर्गराजा फाउंडेशनतर्फे दरवर्षी पावसाळ्यात वृक्षवृक्षारोपणचा उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षी काढून मनिष नगर, रेल्वे क्रॉसिंग भागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फाउंडेशनतर्फे पर्यावरण पूरक अनेक प्रकारची झाडे लावून प्रदुषण मुक्तीचा संदेश दिला.

तसेच वृक्ष दिंडी काढून मनिष नगर भागात पर्यावरण विषयक जनजागृती करण्यात आली. पर्यावरणासाठी पोषक असलेली व ऑक्सीजनची भरपूर मात्रा असलेली पिंपळ, वड , बकुळ, शिसम, अशोक, कडुनिंब आदी झाडे लावून “झाडे लावा झाडे जगवा” चा संदेश देण्यात आला.

फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य काशिनाथ ब्राम्हणे यांचे शुभ हस्ते वृक्ष लावून शुभारंभ करण्यात आला. यानंतर सुभाष नागदेवे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वृक्षारोपण केले. यावेळी वृक्ष दिंडी काढून पर्यावरण संतुलित ठेवण्याचा संदेश दिला व पर्यावरण पूरक असे स्लोगनचे नारे लावण्यात आले.

वृक्षारोपणच्या वेळी प्रा. शिवाजी ढुमने, वामनराव नंदागवळी, उद्योगपती अभिजित रामटेके, डॉ. सोहन चवरे, विधीज्ञ हेमंत मेश्राम, प्रमोद शेंडे, सुभाष नागदेवे, युवराज फुलझले, आदिनाथ शामकुवर, किशोर सातोकर, देविदास ढेपे, शांताराम बहादुरे, संजय बहादुरे, सूर्यकांत सावनकर, पितांबर बालपांडे, महेंद्र सोनारकर, पी.के. मोहता, रामानुज प्रसाद, आत्माराम मेश्राम, मदन पखिड्डे, भास्कर अकुला आदी मान्यवर उपस्थित होते.

वृक्षारोपण कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवाजी ढुमने यांनी केले. त्यांनी निसर्गराजा फाउंडेशन स्थापन करण्यामागची भूमिका विशद केली. उद्योगपती अभिजित रामटेके यांनी ज्या घरासमोर वृक्ष लावण्यात आले आहे त्या भागातील लोकांनी लावलेल्या वृक्षाचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ सोहन चवरे यांनी केले. यावेळी परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: