सेवानिवृत्ती पर्यंत वनकर्मचाऱ्यांचे समस्या निवारणासाठी तत्परता…
ऩागपूर – शरद नागदेवे
ऩागपूर – महाराष्ट्र राज्य वनक्षक व पदो. वनपाल संघटना , वन कर्मचारी व वन क्षेत्रीय कर्मचारी संघटना यांचे वतीने संघटनेचे अध्यक्ष श्री अजय पाटील यांनी आज दि.28/08/2023 रोजी श्री वाय. एल.पी.राव (भा. व.से.) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) म.राज्य नागपूर.हे दि.31/08/2023 रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचे सन्मानार्थ निरोप समारंभाचे आयोजन वन भवन टकले सभागृहात आयोजन केले होते.
संघटनेच्या वतीने मा. वाय. एल.पी. राव प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांना शाल , श्रीफळ तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.या प्रसंगी श्रीमती शोमिता विश्वास (भावसे) अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रशासन व दुय्यम संवर्ग म.रा.नागपूर व मा.प्रवीण चव्हाण साहेब (भावसे) अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) म. रा. नागपूर ,संघटनेचे कार्याध्यक्ष श्री माधव मानमोडे तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी मा. वाय. एल.पी.राव. प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना क्षेत्रीय वनकर्मचारी वनरक्षक , वनपाल,वनमजूर यांचे समस्यांची सपूर्णतः जाणीव असल्याने तसेच त्यांचे सेवा काळात समस्या सोडविण्याचे दृष्टीने नेहमीच सकारात्मक असल्याने सत्काराच्या उत्तरात काही प्रमुख विषयावर आढावा घेऊन शासन स्तरावर मागण्यांसाठी प्रस्ताव तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून योग्य कार्यवाहीचे आश्वासन त्यांनी दिले.
१) वनरक्षक व वनपाल यांचे पदोन्नती प्रकिया दि.१/८/२०२१ चे शासन निर्णयानुसार विहित कार्यपद्धती व कालमर्यादेत कार्यवाही होत नसल्याने तसेच काही वनवृत्तात पदोन्नती विलंबाने होत असल्याने वनपाल पदाचे राज्यस्तरीय सेवाजेष्ठता यादीत ते मागे पडतात. त्यामुळे पदोन्नती बाबत शासन निर्णयाप्रमाणे सर्व वृत्त स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.तसेच वनपाल पदावरून वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर पदोन्नती प्रक्रिया प्रस्तावित असल्याचे त्यांनी सत्कार समारंभात आवर्जून सांगितले.
२) राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या अहवालास शासनाने दि.१३/०२/२०२३ चे शासन निर्णय अन्वये मान्यता दिलेली आहे.त्यानुसार वनरक्षक , वनपाल सुधारित वेतन स्तर मंजूर केलेले आहेत, माहे फेब्रु २०२३ चे शासनाचे आदेशानुसार वनरक्षक , वनपाल यांचे सुधारित वेतनाचे आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत याबाबत योग्य कार्यवाही करण्यात येईल.
३) वनविभागातील वनरक्षक , वन पाल,यांचे सह सर्वच पदाच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करणे बाबत संघटनेची प्रदीर्घ कालावधीं ची मागणी असून त्यानुसार कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे मा. श्री राव साहेब यांनी सांगितले.
४) वनरक्षक वनपाल यांना दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रात मोटारसायकल पुरवठा करणे बाबत प्रस्ताव दि.२१/०७/२०१६ रोजी शासन स्तरावरील चर्चे नुसार सादर करण्यात आला.याचा योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
५)पोलीस कर्मचारी यांचे पाल्यांना पोलीस भरती मध्ये ५% आरक्षणाचे कार्यपद्धती प्रमाणे वन विभाग मध्ये आरक्षण देण्याचे शासन स्तरावर प्रस्तावित करण्याचे आश्वासन दिले.
६) वनसंरक्षण ,वन्यप्राणी संरक्षण व वन जमिनीवर अतिक्रमण बाबत गुन्हे दाखल करणाऱ्या वनरक्षक , वनपाल यांचेवर सातत्याने प्राणघातक हल्ले होतात. वन कर्माच्र्यांना संरक्षणात्मक साहित्य संसाधन पुरवठा ,आरोपीचे विरूध्द प्रकरणाचा योग्य तो पाठपुरावा गृह खात्याचे मंत्रालयातील समिती समक्ष दर तिमाही मध्ये आढावा घेणे याबाबत दि.१९/१०/२०११ चे शासन निर्णयानुसार तरतुदींचे योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
प्रलंबित असलेला गणवेश व साहित्य पुरवठा या करिता निधीची लवकरात लवकर तरतूद करण्याचे सांगितले. उत्कृष्ठ कामगिरीबाबत उत्तेजनार्थ बक्षिसे याबाबत ची कार्यवाही, सूक्ष्म आरखड्या शिवाय इतर योजना व योजनेत्तर ,कँपा निधी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे खात्यात निधी वर्ग न करणे.
सेवापुस्तकाची दुय्यम प्रत पुरविणे. सेवा ज्येष्ठता यादी तात्पुरती व आक्षेपाची पूर्तता करून विहित कालमर्यादेत प्रसिध्द करणे. विभागीय चौकशी प्रकरणे जास्तीत जास्त सहा महिन्यात पूर्ण करणे. वन जमिनीवरील अतिक्रमण निर्मूलन ची जबाबदारी सहाय्यक वन संरक्षक या पदावर निश्चित करणे. प्रत्येक वनपरिक्षेत्र कार्यालयात महिला कर्मचारी यांचे करिता स्वच्छ्ता गृह निर्माण करणे. वन्यजीव विभागात दुर्गम क्षेत्रात कार्यरत वनरक्षक वन पाल यांना एक स्तर वेतनश्रेणी लागू करणे.
महिला वनरक्षक यांना अतिसंवेदनशील क्षेत्रात अत्यंत जोखमीची कामगिरी न देणे. वनरक्षक वनपाल यांना साप्ताहिक रजा किंवा इतर दिवशी मोबदला राजा मिळणे इत्यादी वनरक्षक वन पाल यांचे सेवाविषयक अडीअडचणी बाबत मा.श्री राव साहेब यांनी अत्यंत सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश दिले.
या सत्कार समारंभात संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी होते यात सर्व श्री,अनिल पेंदोरकर,शरद घुगे,संजय माघाडे,धा.पा.चव्हाण,ललित उचीबागले,आनंद तिडके,पवन यादव,विजय गुळेरिकर,सय्यद करीम,अतुल बडगुजर, व्हीं. व्ही. पथ्रिकर, वरसल खान,महेश कर,संजय जिरकर,एम.एस.सरकार, बी डी कांबळे,किशोर मांडवकर,जी एस मेश्राम,विनोद गोल्हेकर,यांचा प्रामुख्याने समावेश होता.