नागपूर – शरद नागदेवे
नागपूर – हिगंणा – स्थानिक संत गमाजी महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित स्वर्गीय देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यातर्फे प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे स्वागत करीत हिंगणा रायपूर, कसबा, धनगरपुरा, वानाडोंगरी, महाजणवाडी, इसासनी, नीलडोह, डिगडोह, गुमगाव, टाकळघाट, देवळी, सावंगी, आमगांव, कान्होलीबारा देवळी पेंढरी,
मोहगाव येथील मेडिकल स्टोअर, जनरल स्टोअर, पूजासाहित्य विक्री केंद्र, आदी व्यवसायिकांना कागदी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक बंदी निर्णयाचे समर्थन करीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वाटप करण्यात आलेल्या कागदी पिशव्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या यातून तयार झालेल्या पंचवीस हजार पेक्षा जास्त पिशव्यांचे वाटप जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर उपक्रम संस्थेच्या संचालिका सौ अरुणा महेश बंग यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक महेश बंग, सरपंच प्रेमलाल भलावी, माजी सरपंच ईनायतुल्ला शेटे प्रामुख्याने उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीते करिता प्राचार्य नितीन तुपेकर, मुख्याध्यापक शशिकांत मोहिते, सूर्यकांत दलाल, नितीन लोहकरे, त्रिशाला सूर्यवंशी, मनीषा कटरे शालिनी सारावत, सुमोना बॅनर्जी, विशालक्षी राव, श्वेता तुपेकर, यांच्यासह संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.