समीक्षा दमाहे प्रथम,अस्मिता देशमुख द्वितीय,सुप्रिया मेंघरे तृतीय
रामटेक – राजू कापसे
नगरधन येथील स्व.इंदिरा गांधी विद्यालयाचा मार्च 2023 चा यंदाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल 95.87 टक्के इतका लागला असून परीक्षेला बसलेल्या एकूण नियमित 97 विद्यार्थ्यांपैकी 93 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या 56 विद्यार्थ्यांपैकी 14 विद्यार्थी प्राविण्य श्रेणी प्राप्त आहेत अनुत्तीर्ण झालेल्या 4 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी हे ए.टी.के.टी श्रेणीत आहेत.
शाळेतून प्रथम येण्याचा मान 87.40 गुण घेऊन समीक्षा रामकृष्ण दमाहे(आजनी) या विद्यार्थिनीने प्राप्त केला आहे.कु.अस्मिता रामू देशमुख(बनपुरी)ही 85.00% गुणांसह द्वितीय आली असून कु.सुप्रिया रामेश्वर मेंघरे (नंदापुरी)ही विद्यार्थिनी 84.80% गुणांसह तृतीय आली आहे.
चौथा क्रमांक -आयुष देवीदास फुटाणे(82.80 %), पाचवा क्रमांक- कु.कृतिका श्रावण गाथे(82.00 %),सहावा क्रमांक – श्रेया विलास तरारे(81.80 %),सातवा क्रमांक -प्रज्वल कृष्णा देशमुख (81.60),
आठवा क्रमांक-कावेरी प्रेमलाल नागपुरे(80.60 % व नववा क्रमांक- अंजली नंदू पाटील (80.40 % )या विद्यार्थ्यांनी 80 टक्केच्या वर गुण घेऊन गुणानुक्रम प्राप्त केला आहे.
गुणानुक्रमे आलेल्या व उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे श्रीमती इंदिरा शिक्षण संस्थेचे सर्व संचालक,शाळेच्या मुख्याध्यापिका,सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.