राजु कापसे प्रतिनिधी
नगरधन : संपूर्ण जगभरात मनसरला आपली एक वेगळी ओळख करून देणारे जगातील सर्वात मोठा ओम म्हणुन लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेल्या रामधाम (तीर्थ) मनसर येथे रामधामचे संस्थापक चंद्रपाल चौकसे दरवर्षी विविध सामाजिक निशुल्क उपक्रम राबवितात
या उपक्रमातूनच एक महिला सशक्तिकरण अभियाना अंतर्गत श्री. चंद्रपाल चौकसे पर्यटक मित्र, रामटेक को -ऑपरेटिव्ह कृषी उद्योग रामटेक तर्फे महिला बचत गट सशक्तिकरण अभियान अंतर्गत आर्थिक विकासाकरिता तांत्रिक प्रशिक्षण शिबीर मार्फत माँ. पार्वती सभागृह, रामधाम तीर्थ मनसर येथे मिक्स तृन धान्याचे लड्डू बनविण्याचे एक दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचे उदघाटन रामधामचे संस्थापक श्री. चंद्रपालजी चौकसे (अध्यक्ष, राष्ट्रीय पंचायती राज ग्रामप्रधान सरपंच संघटन महाराष्ट्र राज्य / पर्यटक मित्र रामटेक) यांचा हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणात महिलांना लड्डू कसे बनवायचे व बनविण्यासाठी काय-काय लागणार अशी सविस्तर माहिती डॉ. स्वेता देवतळे सायंटिफिक ऑफिसर डी. एन.आय. टी. कॉलेज नागपूर यांनी प्रशिक्षणात उपस्थित सर्व महिलांना दिली. या प्रशिक्षणात 1000 महिलांची उपस्थिती होती.
बचत गटाच्या महिलांनी रोजगार प्राप्त होण्याकरिता उत्सुकतेणे प्रशिक्षणात सहभागी झाल्या. रामटेक को ऑपरेटिव्ह कृषी उद्योग मार्फत महिलांना सशक्त बनविण्यासाठी महिला बचत गटांना व युवक व युवतीना कुटीर उद्योग स्थापित करून रोजगाराची संधी प्राप्त करून देऊन दैनंदिन उपयोगाचे पदार्थ बनविण्याकरिता मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मित करण्यात येईल, कुटीर उद्योग सुरु करण्याकरिता आर्थिक सवलती बाबत मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येईल. इच्छुक बचत गटांना उद्योग सुरु करण्याकरिता उद्योग सामग्री संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, महिला बचत गट द्वारा निर्मित वस्तुंना नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक व इतर महानगर येथे विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल असा विश्वास श्री. चंद्रपाल चौकसे यांनी दिले. यावेळी उपस्थित (माविम) प्रशिक्षणात आलेल्या सर्व महिलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. अतिशय आनंदमय वातावरणात कार्यक्रम संपन्न झाले. संचालन सौ. जयश्री खोब्रागडे यांनी केले.
यावेळी सौ संद्याताई चौकसे,सौ कलाताई ठाकरे माजी सभापती,सौ संगिताताई वांढरे, सौ कांचन धनोरे,सीमाताई तुमडाम, व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.