Sunday, November 17, 2024
Homeराजकीयदुष्काळी तालुक्यांना न्याय देण्यासाठी माझे नेहमीच प्राधान्य (खासदार संजयकाका पाटील)...

दुष्काळी तालुक्यांना न्याय देण्यासाठी माझे नेहमीच प्राधान्य (खासदार संजयकाका पाटील)…

सांगली – ज्योती मोरे.

पाण्याविना कोणीही वंचित राहू नये शेतीच्या बांधावर पाणी पोहोचावे यासाठी मी प्रयत्नशील आहे त्याकरता केलेल्या पाहणीद्वारे प्रशासनाशी समन्वय साधून या योजना अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी तत्पर आहे असे प्रतिपादन खासदार संजय काका पाटील यांनी केले.

खासदार संजयकाका पाटील यांनी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दुसरा टप्प्यातील दौऱ्याद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन टेंभू व म्हैशाळ योजनेच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत समवेत भेटी देऊन संवाद साधला त्यावेळी विविध ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

खासदार संजय काका पाटील म्हणाले की,टेंभू आणि म्हैशाळ उपसा सिंचन योजनेचा दुसरा पाहणी दौरा दिनांक 25 ऑगस्ट २०२३ रोजी केला. या दौऱ्यादरम्यान टेंभू आणि म्हैशाळ योजना अधिक क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आणि चालू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाणी केली व चालू सिंचना संदर्भात आढावा घेतला तसेच नागरिकांच्या असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उपायोजनांचा अभ्यास केला व त्या अनुषंगाने उपस्थित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

या दौऱ्या दरम्यान बंडगरवाडी,म्हैसाळ(एम),नांगोळे, इरळी,लंगरपेठ, आरेवाडी, केरेवाडी,शेळकेवाडी,आगळगाव (शेळकेवाडी तलाव),कुची मार्गे जाखापूर (तलाव व बंधारे), कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी,घाटनांद्रे या गावांना भेट देऊन दुर्गम भागात चालू असलेल्या सिंचन योजनांचा आढावा घेतला तसेच शेळकेवाडी येथे बैठक घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांना चालू योजना बद्दल माहिती दिली.

यावेळी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख श्री .प्रभाकर पाटील यांचे सह शेतकरी बांधव, नागरिक, सरपंच,उपसरपंच,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .दौऱ्या दरम्यान प्रशासनाला तात्काळ माहिती देऊन तात्काळ याची बद्दल उपाययोजना होण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी ही सोबत होते.

पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पाटोळे साहेब ,टेंभू व्यवस्थापन समितीचे राजेंद्र रेड्डीयार, ताकारी उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता राहुल कोरे यांसह त्यांचा स्टाफ व अधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ अंमलबजावणी करण्याबाबत सूचना केल्या.

चालू सिंचन योजनांबाबत शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले . यावेळी दौऱ्यामध्ये अधीक्षक अभियंता अधिकारी पाटोळे साहेब, कार्यकारी अभियंता कोरे साहेब, कार्यकारी अभियंता रेड्डीयार साहेब, श्री. अश्विन कर्नाळे,मनोज कर्नाळे, सुनील गायकवाड,अमित डवरी, उप अभियंता श्री. यादव, श्री. धनवडे, श्री. बने,भाजपा तालुका कवठेमहांकाळ अध्यक्ष जनार्दन पाटील ,

अनिल शिंदे, विनायक मोठे, प्रभाकर पाटोळे , प्रल्हाद मुलीक ,महादेव पाटील , मासाळ सर, डॉ. बाळासो पाटील , पिंटू साळुंखे , तात्या कोळेकर , रेमेश कोपेकर , जगताप सर , दत्ता पाटील , अशोक पाटील , तुकाराम शिंदे, सुशांत पोळ, रणजीत घाडगे , अजित माने, राहुल गावडे , डॉ. ठोंबरे , जलाल भाई शेकले, सुहास भोसले , आमुळे, शिवाजी तात्या बोराडे, वैभव पाटील , संजिव पाटील , लक्ष्मण पवार, केरेवाडी सरपंच, विजय घागरे , गावातील सर्व ग्रामस्थ , पदाधिकारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: