Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Today'माझी अवस्था सुशांत सिंग राजपूत सारखी होऊ शकते'...खेसारी लालने केली भीती व्यक्त...काय...

‘माझी अवस्था सुशांत सिंग राजपूत सारखी होऊ शकते’…खेसारी लालने केली भीती व्यक्त…काय म्हणाला?…

न्युज डेस्क – भोजपुरी चित्रपटसृष्टीतील कलाकारांमध्ये परस्पर वैराच्या बातम्या येत असतात. पवन सिंह आणि खेसारी लाल यांचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. दोघेही चाहत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. या सगळ्या दरम्यान खेसारी लालचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. या व्हिडिओमध्ये खेसारी लाल यांनी दावा केला आहे की, त्यांची अवस्थाही सुशांत सिंग राजपूतसारखीच होऊ शकते.

भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते आणि गीतकार खेसारी लाल यादव यांचा भोजपुरी सिनेमात चांगलाच बोलबाला आहे. खेसारी यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. मात्र खेसारीलाल यादव त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. वास्तविक खेसारी लाल यादव यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन चाहत्यांशी संवाद साधला. सर्वप्रथम, त्याने त्याच्या नवीन ‘हसीना’ गाण्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.

यानंतर खेसारी यांनी नाव न घेता भोजपुरी इंडस्ट्रीतील अनेकांची खरडपट्टी काढली. तो म्हणाला की, ‘सर्वांनी मिळून सुशांत सिंग राजपूतला त्रास दिला आणि त्याचा परिणाम असा झाला की आज लोक बॉलिवूडवर बहिष्कार घालत आहेत. माझ्यासोबतही असेच काहीसे घडत आहे, एका व्यक्तीने माझे गाणे यूट्यूबवरून डिलीट केले आहे आणि तो मला सतत त्रास देत आहे. त्याला माझे करिअर संपवायचा प्रयत्न केल्या जात आहे’. खेसारी लाल यादव यांची अनेक गाणी यूट्यूबवरून अचानक डिलीट करण्यात आली होती.

खेसारी यांनी आपल्या लाईव्हमध्ये पवन सिंह यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. खेसारी म्हणाले, “संपूर्ण इंडस्ट्री जरी बडका भैय्याच्या समर्थनात असली, तरी तो घाबरण्यासारखा नाही. माझा भाऊ माझ्या लोकप्रियतेला घाबरतो, त्यामुळे त्याला त्याच्या लोकांसह मला नष्ट करायचे आहे. मी घाबरणार नाही. कोणी काहीही केले तरी मी माझी ओळख स्वतः बनवली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: