दानापुर – गोपाल विरघट
दानापुर येथे पवित्र रमजान महिन्याचे ३० दिवसांचे रोजे पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यावर मुस्लीम बांधवांनी शनिवारी ईद-उल-फितर अर्थात रमजान ईद मोठ्या हर्षोल्हासात साजरी केली.
ईदनिमित्त दानापुर मध्ये दोन्ही मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. नमाज झाल्यानंतर मुस्लीम बांधवांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी रात्री उशिरा देशभरात चंद्रदर्शन झाल्यानंतर दानापुर मध्ये ईदची तयारी सुरू केली. नमाज अदा करणाऱ्यांच्या सुविधेसाठी ग्राम दानापुर मधील मुस्लीदर्गा मध्ये नमाजचे आयोजन करण्यात आले होते.
पारंपरिक वेशभूषा आणि त्यावर सुगंधी अत्तर लावून तयार झालेले सर्वच वयोगटातील मुस्लीम बांधव सकाळीच अल्लाहची करूणा भाकण्यासाठी दर्गामंजीत मध्यये पोहोचले. ऐतिहासिक दर्गामध्ये सकाळी 9 वाजता मौलाना कासम सोदागर यांच्या नेतृत्वात ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. मौलाना ईदचा अरबी खुतबा पठन केल्यानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मुस्लीम बांधवांनी परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी गावातील हिंदू समाज बांधव यांनी शुभेच्छा दिल्यात, मुस्लिम बांधवांनी एक मेकांना गळा भेट दिली, दानापुर परिसरात ईदनिमित्त पोलिसांनी सर्वच कडक बंदोबस्त ठेवला होता. दानापुर मध्ये अत्यंत शांततापूर्ण वातावरणात व हर्षोल्हासात ईद सण साजरा करण्यात आला.
यासाठी हिवरखेड पोलीस स्टेशनचे गवळी साहेब, तायडे मेजर, तंटामुक्ती अध्यक्ष राजू उंबरकर ,पोलीस पाटील संतोष माकोडे, मोबीन शाहा ,शेख गालीप ,शेख शैवकत, उस्मान शाह शकील शाह, शेख रफीक, सैयद अलाउद्दीन, हारून खान,गावातील इतर मुस्लिम समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, युवक वर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होते.,