रामटेक – राजु कापसे
भाग्यश्री काॉलनी परसोडा रामटेक येथील श्री हनुमान देवस्थान पंचकमेटी मंदीरात दि. १०/१२/२०२३ ते १७/१२/२०२३ रोजी संगीतमय श्री शिव महापुराण कथा व रुद्राक्ष ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन केल्याची माहीती पंचकमेटीचे संयोजक प्रभाकर सलामे यांनी दिली. या सोहळ्याचा रविवार (ता. १० डिंसेबर ) सुरु होणार आहे.
या मध्ये (१) शिव महापुराण कथा प्रारंभ , (२) शिवलिंग महीमा पशुपती व्रत मल्लीकार्जुन तसेच महाकाल ज्योतीर्लिंग कथा, (३) रुद्र संहितामध्ये नारद चरित्र. (४) सति चरित्र व शिव पार्वती विवाह, कार्तिक जन्म केदारनाथ भिमाशंकर कथा व श्री गणेश अवतार, (५) त्रिपुरासुर कथा अलंचर कथा त्र्यंबकेश्वर कथा (६) शिवमहापुराण समापन शिव होली व पोती पुजन (७) पुर्णहुती हवन व रुद्राक्ष ज्ञानयज्ञ आदी कथांचे सात दिवस सादरीकरण होणार आहे.
रविवार दि. १७ या रुद्राश्र ज्ञानयज्ञ सोहळ्याचा सांगता कार्यक्रम असुन आचार्य श्री सच्चिदानंदजी महाराज हे कथा प्रवक्ते आहेत. सदर कथा सायं. ६-०० ते रात्री १०-०० या वेळेस सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे अशी विनंती पंचकमेटी तील आयोजकाची आहे.
मदन जी सावरकर स्वप्निल दियेवार, डॉ अंनतजी दाभाडे, विष्णू हटवार, धर्मराज राहाटे, प्रभाकर सलामे, राजू कापसे, कमलेश सायरे, राजू बान्ते, किष्णा गेचुडे, सोनु लाबडे, किशोर फलके, नामदेवराव लबडे, राकेश देवीकर, विजयजी सुरकर, महेश ठाकरे, व श्री हनुमान देवस्थान पंचकमेठी व संगीतमय श्री शिव महापुराण कथा व रुद्राक्ष ज्ञानयज्ञ भाग्यश्री काँलनी परसोडा रामटेक व कार्यकर्ते उपस्थित होते.