रामटेक – राजु कापसे
रामटेक तालुक्यातील स्वामी सीतारामदास महाराज विद्यालय शिवणी भोंडकी येथील मुलींनी जिल्हास्तरावर विजय प्राप्त करून विभागीय स्तरावर पातळी गाठली.या मुलींची तालूक्यात एकच चर्चा सुरु आहे. रामटेक येथे तालुका स्तरावर 25 ऑगस्ट रोजी कबड्डी सामने घेण्यात आले होते या मध्ये शिवणी भोंडकी येथील मुलींनी बाजी मारीत थेट जिला पातळी गाठली होती.
आज नागपूर येते जिलास्तरावर सामने घेण्यात आले होते यात शिवणी भोंडकी येथील स्वामी सीतारामदास महाराज येथील मुलींनी फायनल सामन्यात दणदणीत विजय प्राप्त करून थेट आता विभागीय स्पर्धा गोंदिया करिता जागा प्रप्त केली आहे…
.रामटेक तुमसर रोडवर असणाऱ्या या खेड्या गावातील विद्यार्थीनी यांनी जिल्हा पातळी वर विजय प्राप्त करून यांनी विभागीय स्तराकरिता निवड झाली आहे.
आज नागपूर येते झालेल्या सामन्या मध्ये विभागीय स्पर्धा करिता काटोल, कामठी, कुही, मौदा, या तालुक्याच्या चमुंला पराजित करीत थेट विभागीय निवड झाली आहे, या विधार्थ्यांचे सर्वाकडून कौतुक केले जात आहे… या चमुचे शिवणी येथील बसस्थाकावर आल्यावर फटाकायची आतिसबाजी करीत गावात मिरवणूक काढण्यात आली..
या मध्ये क्रीडा शिक्षक कृष्णा पाटील, केशव क्षीरसागर सर तशेच महिला क्रीडा शिक्षक गजभिये यांचे गावातील नागरिकांना तर्फे कौतुक करण्यात आले या वेळी शाळेतील शिक्षकांवृंद मुख्याध्यापक पुडके सर. किशोर बिनझोडे, दिवाकर बांधाठे, शिवशंकर झिझोते, राकेश ढोक, आदीचे गावाकऱ्या तर्फे कौतका स्पद करून शुभेच्छा देण्यात आल्या