मूर्तिजापूर : सध्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून बरेच राजकारण सुरु आहे. तर विरोधकांना राजकारण करू नये असे वारंवार सत्ताधारी सांगून सुद्धा प्रकरण शांत व्हायचे नाव घेत नाही. एवढच काय तर या प्रकरणामुळे महायुतीत उभी फुट बघायला मिळत आहे. यावेळी विरोधक आक्रमक असल्याने सत्ताधारी एक पाऊल मागे घेतल्याचे दिसत आहे. तर मुर्तीजापुर शहरात विरोधकांवर हावी होण्याची मोठी संधी सत्ताधारी पक्षाने गमावली असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात एका भावी उमेदवाराची प्रचार यात्रेसाठी शहरातील छत्रपती शिवाजी चौकात मा जिजाऊचे पूजन करताना चक्क पायात बूट घालून एका राष्ट्रवादीच्या नेत्याने पूजन केले होते. तश्या आशयाच्या बातम्या सुद्धा प्रसारित झाल्या होत्या मात्र यावर शहरातील सत्ताधारी पार्टीतील काही बेवडे नेत्यांनी दुर्लक्ष केले. असे या नेत्यांनी जाणून बुजून केले असल्याची चर्चा सध्या जनसामान्यात सुरु आहे. तर नेहमी सोशल मिडीयावर भाऊचे गुणगान करणारे बेवडे पदाधिकारी माल मारून झोपी गेल्याचे पाहायला मिळाले आहे.
काही वर्षाआधी एका भाजपा पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर सोनिया गांधी यांनी राजमाता असा उल्लेख केला होता त्या वेळी संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ यांनी त्यांना फोन करून तुम्ही राजमाता जिजाऊचा अपमान केला म्हणून धमकी दिली होती. कारण तो गरीब होता त्याने बिनशर्त माफी मांगितली. तर मागील वर्षी १४ एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी रवी राठी यांच्या कडून अनावधानाने चुक झाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची बुट घालून वंदन केले होते तर त्यावेळी वंचित आणि भाजप यांनी जोरदार टिका केली होती. तेव्हा रवी राठी यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ संदेश जारी करत माफी मांगितली. तर काही दिवस आधी अर्जुन लोणारे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका केली असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यावेळी त्यांची भाजपाचे युवा कार्यकर्ते यांनी शहर पोलिसात तक्रार केली व त्याला धमकी सुद्धा दिल्या गेली एवढच काय तर यापुढे टिका करशील तर याद राख म्हणून आमदार हरीश पिंपळे यांनी मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. तोही गरीब आणि वारकरी असल्याने त्याला धमकी देणे सोपे होते. त्या बिचार्या वारकऱ्यांवर भाजपचे काही पदाधिकारी सोशल मिडीयावर तुटून पडले होते.
मात्र मागील आठवड्यात या छत्रपती शिवाजी महाराज नावाने राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट एका पार्सल उमेद्वारच्या प्रचारासाठी शेतकऱ्याचा कवडीचाही संबध नसलेल्या शिव स्वराज यात्रेचे आयोजन केले होते. शहरातील छत्रपती शिवाजी चौकात राष्ट्रवादीचे पाच सहा उत्साही कार्यकर्ते जमा होऊन मोठा यात्रेचा वाजागाजा केला. मात्र यावेळी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने राजमाता जिजाऊ आई साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करताना पायातील बूट काढला नसल्याचे दिसून आले. सदर बाब तेथील उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या लक्षात आली पण कार्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. या घटनेचे वृतांकन काही स्थानिक न्यूज पोर्टलच्या पत्रकारांनी केले. मात्र आपला कोणीच काही वाकडे करू शकत नाही व कोणीही त्यावर बोलायला तयार नाही भाजपा चे युवा कार्यकर्ते आज यावर गप्प का ? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असणारा शिवसेना ठाकरे गट गप्प का? वंचित आघाडी गप्प का?छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावाने चालवाणाऱ्या संघटना गप्प का?…