मूर्तिजापुर शहरात काजल संकेत कांबे हिच्या आत्महत्येन संपूर्ण शहर हादरून गेलंय, ज्याचा त्याचा एकच प्रश्न काजल कांबे/शर्मा हिने आत्महत्या सारखं टोकाचा निर्णय का घेतला असेल?…एका प्रतिष्ठित कुटुंबातील सून तसेच शहरातील लेक असलेला काजलने कोणताही मागचा पुढचा विचार करता रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. काजल संकेत कांबे हिचे वय माहिती प्रमाणे २४ असल्याचं समजते. दरम्यान कौटुंबिक वादातून काजलनं आत्महत्या केली असावी असा, संशय व्यक्त केला जातोय. तरीही या प्रकरणास पुढील तपास मूर्तिजापुर पोलीस करत आहेत.
काजल कांबे ही आत्महत्यापूर्वी मुर्तीजापुर रेल्वे स्थानकावर गेली होती, इथे जवळपास ३० मिनिट पेक्षा जास्त वेळ बसून होती. त्यानंतर जिथे रेल्वेचे इंजिन उभे राहतं तिथेही ते गेली, परंतु तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला हटकले अन् तिथूनही निघून गेली. थोड्या वेळाने काजल तिच्या स्कुटीने रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर एका नाल्याजवळ म्हणजेच चिखली गेटच्या रेल्वे रुळावर गेली. तिथे आपली स्कुटी उभी करून चप्पल ठेवून दिली. अन् पुणे- अमरावती सुपर फास्ट रेल्वे येताच तिने रेल्वे समोर उडी घेतली.
काजल शर्मा असे माहेर कडील नाव, लग्नापूर्वीपासूनच काजल आणि तिचा पती संकेत दोघांमध्ये प्रेम होत, नंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही कडील मंडळीच्या राजीखुशीने विवाह पार पाडला. मात्र या लग्न समारंभात एक अडचण आली होती ती म्हणजे संकेत याच्यावर गंभीर आरोप करीत अकोल्याच्या एका ब्लॅकमेल करणाऱ्या मुलीने विवाह होऊ देणार नाही अशी धमकी दिली होती. त्यामुळे विवाह सोहळ्यात पोलिसांचा बंदोबस्त होता आणि अखेर विवाह पार पडला अन् प्रतिष्ठित डॉक्टर राजेश कांबे यांची सून झाली. आता या विवाहाला पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला.
डॉ. कांबे यांचा एकुलता एक मुलगा संकेत हा दिसायला एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही, त्याचं वैभव पाहूनच तरुणी त्याच्याकडे आकर्षित व्हायच्या मात्र यातच त्याच लग्न झालं आणि दोन गोंडस मुलं झाली त्यामुळे त्याचं बाहेरील फिरणं कमी झालं, कांबे परिवार काजल हीला मुलीप्रमाणे वागवत होता. काजलनं आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्यापही कळू शकले नाही, या आत्महत्यमागे पतीपत्नी मधील वादाची किनार आहे का? या दिशेने पोलीस तपास करीत आहे.
काजलच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यास नक्कीच पुढील चौकशी केल्या जाईल तरीही तिच्या आत्महत्यामागील मूळ कारण अद्याप समोर आले नसून काजल हीचा मोबाइल सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यात त्यांना काही सुगावा मिळतो का? काजल हीचा आत्महत्येचा सर्वच अँगेल ने पोलीस निरीक्षक सचिन यादव आणि त्यांची टीम तपास करीत आहे.