Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर | वडीलांचे पार्थिव घरी नेत असताना मुलाच्या दुचाकीला ट्रकने उडविले...मुलगा ठार...

मूर्तिजापूर | वडीलांचे पार्थिव घरी नेत असताना मुलाच्या दुचाकीला ट्रकने उडविले…मुलगा ठार…

मूर्तिजापूर : येथून जवळच असलेल्या व ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो फाट्यावर समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिली या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना काल ३ जून रोजी पहाटे ५:३० वाजताच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.

सिरसो फाट्यावरुन थोड्याच अंतरावर असलेल्या रेपाडखेड येथील रहिवाशी सिध्दार्थ जानराव जामनिक यांच्या वडीलांचे पहाटे ४ वाजता रुग्णालयात हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. वडीलांचे पार्थिव घरी आणत असताना सिध्दार्थ जानराव जामनिक (४२) हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० व्ही ३८७८ ने गावी येण्यासाठी समोर निघाले असता सिरसो फाट्यावर दर्यापूर कडून येणाऱ्या ट्रक कमांक एमएच २७ बीएक्स ०१९३ ने दुचाकीस जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीचा चुराडा झाला व सिध्दार्थ जामनिक यांचा उजवा पाय पुर्णतः निकामी झाला व डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर अवस्थेत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थाच्या रुग्ण वाहीकेतून येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान वडीला पाठोपाठ सिध्दार्थचाही सकाळी ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.

पिता-पुत्राचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने परीसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. संध्याकाळी दोघांवरही रेपाडखेड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास ठाणेदार गोविंद पांडव याच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: