मूर्तिजापूर मतदार संघाचे विकासपुरुष हरीषभाऊ पिंपळे यांनी विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर काय घडलं या विषयाची शहरात जोरदार चर्चा आहे. तो शुक्रवार ओल्या पार्टीत रंगल्याने त्यामुळे काही स्थानिक पत्रकारांना पर्वणीच प्राप्त झाली होती. काय घडलं नेमकं त्या पत्रकार परिषेदेत जाणून घेऊया…
यंदा भाजपा सरकारला 9 पूर्ण झाल्याने त्याचं संपूर्ण देशात ब्रँडिंग सुरू केलं. आपल्या जिल्ह्यातही लोक प्रतिनिधींना पत्रकार परिषद घेऊन आपण केलेल्या विकास कामाचा पाढा वाचायचं सांगितलं. यावेळी आमदार पिंपळे यांनी संबोधित करीत असताना आपल्या मतदार संघात 1300 कोटींचा निधी आणला आणि संपूर्ण मतदार संघात भरभराटी केल्याचा केविलवाणा आव आणला.
यावर काही पत्रकारांनी इकडचे तिकडचे बिनकामाचे प्रश्न ही केले मात्र शहरातील मुख्य प्रश्न सोडून दिले.
१) शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता कधी पूर्ण होणार? (आंतरराष्ट्रीय यासाठी कारण समृद्धी महामार्गापेक्षा महागडा शहरातील रस्ता आहे. समृद्धी महामार्ग आणि आपल्या शहरातील रस्त्याच्या कामाची सारखी सुरुवात झाली होती…तेव्हा महामार्गाच्या कामाचा 16 कोटी एक km होता तोही 8 पदरी, आपला तर दोन पदरी आहे…)
२) शहरातील पाणी समस्या केव्हा सुटणार?
३) त्या 7 कोटी तात्काळ पाणी पुरवठा योजनेचे काय झाले?
काही पत्रकार हे प्रश्न विचारणार होते, तेवढयात मटणाच्या भाजीचा सुगन्ध हॉल मध्ये आला आणि विचारणारे बुचकळ्यात पडले?…मग कधी पत्रकार परिषद संपते आणि केव्हा तुटून पडतो असे दोन चार पत्रकारांना झाले. कारण भाऊने तब्बल 14 वर्षांनी अशी ओल्यापार्टीची सोय केली होती.
पत्रकार परिषद संपली व काही वेळात तिन्ही रुमचे दरवाजे बंद झाले, व्हेज खाणारे बिचारे यांना बाहेरच शोधत बसले, मात्र माहीतच नव्हते बंद दाराआड काय सुरू होतं…रात्रीच 11 वाजले तरी पार्टी काही संपेना एवढंच नाही तर एका पत्रकाराने उद्याची सोय म्हणून तिथून बंदा खंबाच घेऊन पळाला.
मूर्तिजापूरकरांनो तुम्ही झोपेच सोंग घेता म्हणूनच शहराची अशी अवस्था आहे, तुमचे कोणीच प्रश्न मांडणार नाही तुम्हीच बोलायला शिकले पाहिजे, गेल्या 25 वर्षापेक्षा जास्त वर्ष पाण्याचा संकटाचा सामना तुमचा संपत नाही. कधी संपणार हेही माहीत नाही?…मग किती दिवस सहन करणार? तुमचे प्रश्न ज्यांनी मांडायला पाहिजे त्यांची काय अवस्था आहे, तुम्ही पाहू शकता. खरंच आपल्या शहराचा विकास झाला का? की, फक्त विकासासाठी खर्च केल्याचे कागदावरचे कोट्यावधीच्या घरातील आकडेच बोलतात.