Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayमूर्तिजापूर | जेष्ठ पत्रकार विकास भाष्करराव सावरकर यांचे निधन...

मूर्तिजापूर | जेष्ठ पत्रकार विकास भाष्करराव सावरकर यांचे निधन…

मूर्तिजापूर येथील भारतीय शिक्षा मंडळाचे सचिव व माजी प्राचार्य, पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाहक व जेष्ठ पत्रकार विकास भाष्करराव सावरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दि २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता निधन झाले. त्यांच्या अचानक निघून जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे.

विकास सावरकर यांनी अनेक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्ना संदर्भात वेळोवेळी आंदोलन करून न्याय मिळवून देण्याची भूमिका सातत्याने मांडली त्याच बरोबर पश्चिम विमाशी संघटनेचे माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला पत्रकार क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोठे योगदान असून अनेक वेळा पत्रकारांना सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले तसेच त्यांनी शिक्षक आमदारची निवडणूक सुद्धा लढवीली होती.

त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण परिसरात मित्र मंडळात नातेवाईकात मध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले त्यांची अंतयात्रा दि. २५ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १० वा. त्यांच्या राहते घरी जुनी वस्ती वकील पुरा येथून निघेल. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुन, नातू, असा आप्त परिवार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: