मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे चोरट्यांचे दिवसेंदिवस मनोबल वाढत चालले आहे. शहरात गेल्या महिन्याभरा पासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून महिन्याभरात मूर्तिजापूर शहरात ९ ते १० ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडल्या आहेत. मात्र पोलिसांना चोरट्यांचा शोध घेण्यात अध्यापही यश मिळाले नसतांनाच पुन्हा एकाच परिसरात एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याची घटना समोर आलीय.
मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरातील गणेश नगर स्थित असलेल्या शांती नगर येथे शनिवार दि. (2८) च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत घराच्या कडी-कोयंडा तोडून एकाच रात्री एकाच परिसरात दोन घरफोड्या करून एकूण दोन्ही घरातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकसष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. विशेष म्हणजे चोरट्यांनी आजूबाजूच्या घरातील नागरिकांना आवाज येईल या भीतीपोटी चक्क परिसरातील इतर घरांना भाहेरून कडी लावून बंदिस्त करून ठेवल्याचे परिसरातील काही नागरिकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
गणेश नगर स्थित असलेल्या स्टेशन विभाग परिसरातील शांती नगर येथे राहणाऱ्या राजेश भातखंडे हे व त्यांचे शेजारी दिनेश किसन बाहे घरगुती कामानिमित्त बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेवत राजेश भातखंडे यांच्या घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटातील २० हजार रुपये रोख रक्कम, ३ ग्राम सोन्याच्या दागिन्यांची नथ, एक ग्राम सोन्याच्या दागिन्याचे पोथ व चांदीचे विविध भांडे असा एकूण २३ हजार रुपयांचा ऐवज तर दिनेश किसन बाहे यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांचे अडीच ग्रामची अंगठी, ३ ग्राम ची सोन्याच्या दागिन्यांचे कानातले व चांदीचे २० ग्राम चे विविध भांडे आणि १२ हजार रुपये रोख असा एकूण ३८ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांच्या नोंदी नुसार चोरांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
गेल्या महिन्याभरतील सदर घटना ही ९ ते १० वी असून अध्यापही पोलिसांना चोरीचा सुगावा लावण्यात यश मिळाले नसल्याने शहरात नागरिक सुरक्षित आहेत की नाही..? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहरात गेल्या महिन्याभऱ्यापासून सुरू असलेल्या चोऱ्यांचे सत्राचे गांभीर्याने घेऊन चोरट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहे.