मूर्तिजापूर : संपूर्ण भारताला स्वच्छतेचा संदेश देणारे कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व गाडगे बाबा यांच्या हस्ते स्थापन झालेल्या गोरक्षण संस्थेची अवस्था अत्यंत दयनीय आहे. गौरक्षण परिसरात घाणीचे साम्राज्य असून या येथील नागरिकांना घाण पाण्यातून ये-जा कारवाई लागत असल्याने येथील नागरीकांच आरोग्य धोक्यात आले आहे.
रेल्वे लाईनच्या बाजूला असलेले गोरक्षण संस्था ही स्वतः गाडगेबाबा यांनी स्थापन केली आहे, येथे जनावरांसाठी गोरक्षण व खेड्यापाड्यातील शिक्षणासाठी आलेल्या गोरगरिबांच्या लेकरांना राहण्याची सोय म्हणून याठिकाणी मोठे वसतिगृहाची स्थापना केली, आजही या ठिकाणी 87 लेकरं वास्तव्यास आहेत. सोबतच संस्थेची देखभाल व इतर 47 गरीब परिवार या ठिकाणी आश्रयास आहेत. तर येथे दररोज चार वाजता गरजुवंत, दिव्यांग गरिबांसाठी अन्नदान सदावर्त अजूनही चालते मात्र त्यांना यायला मार्गच दिसत नसल्याने खाली हात परतावे लागते.
गेल्या कित्येक वर्षापासून गोरक्षणवासियांना शहरात ये-जा करण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने त्यांना नाईलाज रेल्वेच्या पुलाखालून येणेजाणे करावे लागते, याच पुलाखालून गावातील सांडपाणी वाहत जाते, घाणीचे पाणी बाहेर काढण्यासाठी नगरपालिकेने पाईपलाईनची व्यवस्था केली होती मात्र ती अनेक वेळा फुटल्याने संपूर्ण घाणीचे पाणी त्या पुलाजवळच साचल्या जाते. पाउस जर आला तर मग ठिकाणी नागरिकांच्या घरातही पाणी घुसते, अनेक नागरिक येथे जीव धोक्यात घालून राहतात.
येथील नागरिकांच्या मते नगरपालिकेचा कोणताही अधिकारी इकडे फिरकत नसून आम्हा गौरक्षणवासियांना वाळीत टाकले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. येथील जनसेवक फक्त भाषणात गाडगे बाबांच्या नाव घेतात मात्र प्रत्यक्षात दुर्लक्ष करतात. कर्मयोगी संताच्या कर्मभूमीत विकासाची गंगा नाही तर सम्पूर्ण शहरातील घाणीची गंगा पोहचली, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
एकीकडे शहरात विकासकामाचा भूमिपूजनाचा सपाटा सुरु असतांना मात्र ज्या गाडगेबाबांच्या नावान आपल्या शहराची ओळख आहे, त्याच ठिकाणाचा विसर जनसेवकाला पडला कि काय?…