Tuesday, November 5, 2024
HomeBreaking Newsमूर्तिजापूर | अल्पभूधारक शेतकऱ्यासह शेतमजुराची आत्महत्या!...सलग दोन आत्महत्यांनी हादरला तालुका...

मूर्तिजापूर | अल्पभूधारक शेतकऱ्यासह शेतमजुराची आत्महत्या!…सलग दोन आत्महत्यांनी हादरला तालुका…

राज्यातील शेतकरी संकटात असतांना शिंदे-फडणवीस मुख्यमंत्र्यांसह बरेच मंत्री सध्या गुवाहटी दौर्यावर गेले आहेत. अकोला जिल्ह्यात दोन आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्यात. मूर्तिजापूर तालुक्यातील शहर व ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशन अंतर्गत दोन वेगवेगळ्या आत्महत्या झाल्याने सम्पूर्ण मूर्तिजापूर मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पहिली घटना मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखली गावात सकाळच्या सुमारास पुढे आली. येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

प्रकाश श्रीराम मकेश्वर वय,४२ असे मृतकाचे नाव आहे. मृतक प्रकाश श्रीराम मकेश्वर यांच्या नावाने 3 एकर शेती आहे. कर्ज काढून त्यांनी तीन एकर शेतीमध्ये पिकाची पेरणी केली होती. परंतु अतिवृष्टीमुळे पिकांच्या उत्पादन मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तसेच तूर पिकावर विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांची पेरणी साठी लावण्यात आलेला खर्च ही निघत नसल्याचे न दर्शनास आल्यामुळे खचून जाऊन मृतक प्रकाश श्रीराम मकेश्वर यांनी शुक्रवारी रात्री च्या सुमारस स्वतःच्या शेतात विष प्राशन केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला सकाळी परिसरातील नागरिक जेव्हा शेतात जात होते तेव्हा त्यांच्या लक्षात ही बाब आली असता नागरिकांनी सदर घटनेची माहिती मूर्तिजापूर पोलिसांना दिली.

तर दुसरी घटना मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिरसो या गावांत घडली असून गावात राहणाऱ्या शेतमजूर 27 वर्षीय मृतक हितेश बाबरावं मोरे या युवकाने आपल्या राहत्या घरात चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हितेश हा देखील शेती करत असून घरात आई वडील पत्नी एक लाहन भाऊ राहतात आज सकाळच्या सुमारास् हितेश याच्या लहान भावाला हितेश हा गळफास घरातलेल्या परिस्तितीत निदर्शनास आला असता त्याने आरडा ओरडा केला आजू बाजूच्या नसगरिकांनी सदर घटनेची माहिती मूर्तिजापूर पोलिसांना कळवली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पण हितेश याची प्राण ज्योत माळवली होती मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह आमदार हरिष पिंपळे द्वारा संचालित आपात कालीन पथक च्या सहकार्याने मूर्तदेह शवाविच्छेदनासाठी मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून अध्याप पर्यंत आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याने मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस अधिक तपास करित आहेत. आज मूर्तिजापूर तालुक्यात घेडलेल्या सलग दोन आत्महत्या मुळे खळबल उडाली असून हळहळ देखील व्यक्त होत आहे..

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: