मूर्तिजापूर व दर्यापूर तालुक्याच्या वेशीवर पूर्ण निधी तीरावर असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान येथे स्व. सितारामजी परमसुखदासजी राठी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री रमेशचंद्र राठी यांनी बांधून दिलेल्या संत निवाचे लोकार्पण शुक्रवारी प. पू . महामंडलेश्वर कनकेश्वरी देवी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
माताजींचे आगमन होताच महिला वारकरी मंडळ व सेवादारी मंडळ यांनी शिवनामाच्या गजरात स्वागत केले. माताजींच्या हस्ते भगवान लक्ष्वराचे पूजन व लोकार्पण पार पडले. यावेळी मुर्तीजापुर ते आमदार मा. हरीश पिंपळे सौ. नूतन ताई पिंपळे यांच्या हस्ते लक्षेश्वर संस्थांच्या वतीने माताजींचे पूजन करून भगवान लक्षेश्वराची शृंगार फोटो फ्रेम भेट देण्यात आली.
प. पू. कनकेश्वरी देवीनी भाविकांना संबोधित करताना श्री लक्षेश्वर संस्थांच्या कार्याचा गौरव करीत येथे साक्षात लक्षेश्वर महादेवाचा व संत महात्म्यांचा वास असल्यामुळे या ठिकाणी विशेष महत्त्व असल्याचे सांगितले व राठी परिवाराने केलेल्या कार्याचा गौरव केला. यावेळी माताजींचे हुबेहूब चित्र रांगोळीने साकारणाऱ्या कु. मोहिनी व कु. नंदिनी मेहर या भगिनींचा माताजींनी कौतुक करून आशीर्वाद दिले.
लोकार्पण कार्यक्रमाला सद्गुरु परिवाराचे पुरुषोत्तम मालानी अकोला , विजयकुमार दमानी , डॉ . संपदा सपकाळ ,भगवानदासजी तोष्णीवाल , मनोजजी अग्रवाल , नंदकिशोरजी भैय्या दर्यापूर, अशोकजी चांडक अमरावती, प्रदीपजी देशमुख , रवी राठी , यांच्यासह लक्षेश्वर संस्थांचे पदाधिकारी ठाकूरदास अरोरा, त्रिलोक महाराज, राधेश्याम राठी, एड . चंद्रजीत देशमुख , पुरुषोत्तम डागा ,नाना मेहर ,कैलास तामसे , प्रेम कैथवास , लादु महाराज, श्रीकांत देशमुख , दत्ता गव्हाळे , तुळशीराम वरणकर , नजाकत पटेल , अशोक राठी , दिलीप सुरदुसे यांच्यासह युवा सेवाधारी उपस्थित होते . अशी माहिती श्री लक्षेश्वर संस्थांचे अध्यक्ष राजु दहापुते यांनी दिली.