मूर्तिजापूर – तालुका क्रीडा संकुलावर शहरातील सर्व विद्यार्थी पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षेच्या सराव करण्याकरिता नियमित येत असतात. या क्रीडा संकुल ला लागून असलेल्या आठवणी बाजारातील मटन व्यापारी उरलेल्या मटणाची विल्हेवाट न लावता ते इतरत्र फेकून घान पसरवीत आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊन अडथळा होत आहे. या मटण व्यापाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी.अशा आशयाचे निवेदन सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,मुख्याधिकारी व आमदार हरिष पिंपळे यांना देण्यात आले.यावेळी पंकज बजर,राहुल तोडकर,तेजस इंगळे,प्रतीक साबळे,राज डोंगरे,अजय मोगरे,
देवानंद खिल्लारे, आनंद शेळके,नसरुल्ला खान,आशिष तांदळे,विशाल पवार,श्याम काकडे,दिपिका पाचडे,पौर्णिमा ढोरे,अनुष्का साबळे,कोमल खाडे,भविका खंडारे,साक्षी जोशी,भक्ती,राणी खंडारे,शीतल जाधव आदी विद्यार्थी उपस्थित होते.