मूर्तिजापूर शहरात एकेकाळी स्टेशन विभाग आणि जुनी वस्ती या दोन्ही भागाची दहशत होती जुन्या वस्तीत पहेलवान तर स्टेशनवर अण्णा यांच्यात अनेकदा गँगवार झालेत मात्र कालांतराने शहर एवढं शांत झालं की सर्व दादा,भाऊ सर्व शांत झाले. मात्र सर्व शांत झाले म्हणून सुऱ्या उर्फ सुरेश देशमुख नामक पुन्हा शहरात पुन्हा भाईगिरी सुरू करून मागील दिवस पुढे आणायला सुरुवात केली होती मात्र ती पसरण्यापूर्वीच त्याचा खात्मा केला…त्याच्या मृत्यू विषयी कोणालाही हळहळ नाही…
एखाद्या चित्रपटाप्रमाणे ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले, काय घडलं होत ते जाणून घेऊया…27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता गजबलेल्या तोलाराम (भगतसिंग) चौकात नुकताच कैद भोगून आलेल्या सुरेश देशमुखची हत्या झाली, हत्याच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगत असतांना अचानक सुटका का झाली ? असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. 77 वा स्वातंत्र्य दिनी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोहातंर्गत राज्यातील 186 कैद्यांची कारागृहातून सुटका केल्या गेली यामध्ये सुरेश होता.
सुऱ्याची कारागृहातून सुटका झाली अन् मग त्याला रानच मोकळ झाले कारण शहरातील दादागिरी संपली होती. त्याने हळुहळू जिथं राहत होता त्याच परिसरात लोकांना धाक दाखविणे, रस्त्यावर फळे विक्रेत्यांना शिवीगाळ करणे त्यांच्याकडून हप्ता वसूल करणे, लोकांना चाकू दाखवणे त्यांना शिवीगाळ करणे त्यांना मारहाण करणे काही लोकांना जिव्या मारण्याची धमकी सुद्धा देने व परिसराचे सर्व नागरिक सुरेश देशमुख यांच्या गैरवर्तूनिकीला कंटाळून गेले होते. घटनेच्या दिवशी मृतक सुरेश देशमुख हा खलील नामक युवकाच्या मागे चाकू घेऊन लागला होता, त्या युवकाला चाकू फेकून मारले पण निशाणा चुकाला असल्याची चर्चा आहे. यादरम्यान अब्दुल खलीक युवकांनी स्वतःला वाचविण्यासाठी खाली पडलेला चाकू घेतला आणि सुरेशच्या पोटात सपासप वार केलेत. मारेकरी 25 वर्षीय असल्याने सुऱ्या त्याच्या समोर टिकला नाही आणि सुऱ्याला धाराशयी केलं.
घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असल्याने घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तोपर्यंत मारेकऱ्यांनी त्याला संपवून घटनास्थळावरून पसार झाला. इकडे पोलिस आरोपींचा शोध घेत असताना आरोपी स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाला. सुऱ्या शहरातील फळ विक्रेता, राजकीय लोक व गोरगरीब नागरिकांना विनाकारण शिवीगाळ करत होता त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहे. या प्रकरणांमध्ये काल दिनांक 28 ऑक्टोबर रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असताना न्यायाधीश यांनी 30 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कस्टडी दिली आहे. पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात एपीआय वळतकर करीत आहे.