मूर्तिजापूर – नरेंद्र खवले
ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रात मोफत ज्ञान दानाचे कृतिशील कार्य करणाऱ्या ” प्रकाशवाट ” प्रकल्पा अतंर्गत सुपर ५० च्या मोफत नवोदय शिकवणी वर्गाचा श्रीगणेशा आज दिनांक १७ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता विदर्भ ॲकेडमी येथे करण्यात आला.
ग्रामीण भागातील गोर-गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्तम संधी मिळाव्यात या उदात्त हेतूने न्यायमूर्ती अनिल कीलोर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ” प्रकाशवाट ” प्रकल्पाच्या माध्यमातून सन २०२४ – २५ करीता जवाहर नवोदय विद्यालय सुपर ५० मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्यात आला आहे त्यासाठीची निवड चाचणी परिक्षा गाडगे महाराज विद्यालयात पार पडली होती तालुक्यातील विविध शाळांच्या १५० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.
त्यामधून सुपर ५० या हेड खाली गुणवत्तेनुसार विद्यार्थ्याची निवड करून आज दिनांक १७ ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता विदर्भ ॲकेडमी येथे जवाहर नवोदय परिक्षेच्या पुर्व तयारी साठीच्या मोफत शिकवणी वर्गास प्रारंभ केला आहे. यामध्ये आमदार हरिष पिंपळे यांनी बोलल्या प्रमाणे दिलेल्या नवोदय कीटचा वाटप करून विद्यार्थांचा परिचय करून घेत प्रार्थना घेऊन शिकवणीस सुरुवात झाली.
प्रारंभिक गणित विषय आदर्श शिक्षक विशाल वैद्य , खांदला यांनी तर बुद्धिमत्ता विषय कृतीतून अतीशय तळमळीनं आदर्श शिक्षक आश्विन बागडे यांनी शिकविला. विद्यार्थ्यांना दुपारच्या सुटीत २ ते २.३०दरम्यान पोष्टिक असा उसळचा नाष्टा देण्यात आला. नाश्त्याच्या सेवे साठी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आपल्या किंवा आपल्या पाल्यांच्या वाढिवसानिमित्त मुलांना नाश्ता उपलब्ध करुण देण्याचे आवाहन प्रकाशवाट प्रकल्पा कडून कऱण्यात येत आहे.
या करीता ५ किलो ची उसळ आपण स्वतः बनवून आणून देऊ शकता किंवा १५०० नाश्ता निधी एक दिवसाचा देऊन सहकार्य करू शकता. जर कोणाला या सदर कार्यात सहभागी व्हायचे असेल तर एक दिवस पहिले आपले नाव नोंदणी करणे अपेक्षित आहे. असे आवाहन सर्व दानशूर नागरिकांना कऱण्यात येत आहे.