Sunday, December 22, 2024
HomeSocial Trendingमूर्तिजापूर | तर यावेळी शहरातील ‘या’ रावणाचा नाश होणार...भाग ३

मूर्तिजापूर | तर यावेळी शहरातील ‘या’ रावणाचा नाश होणार…भाग ३

मूर्तिजापूर : एका बातमीने या लिंग पिसाट नेत्याचे बिंग फुटणार कधीच वाटलं नव्हतं मात्र बातमीची सिरीज सुरू होताच हळूहळू त्या मुलीच्या हत्येचा घटनाक्रम समोर येत गेला. अनेकांचा यावर विस्वास बसत नसेल परंतु काहीतरी या पिसाटाने कांड केला असेल असा अनेकांचा विश्वास आहे. त्याच्या सोबत असणारे ग्लासमेट तर कोमात गेले पण बाहेर आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत नाही. मात्र आतून तो नेता पूर्ण आतून पोखरल्या गेला असल्याचे कळते. आता निवडणुकीचा काळ बघता याच निवडणुकीत त्या नेत्या बाबत मोठा गौप्यस्फोट होणार आहे. त्यापूर्वी सर्व वातावरण शांत ठेवायचं आहे. या हत्येच्या संदर्भातली अनेक पुरावे या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सादर होतील अशी आशा आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती ठेवणारा एक पोलीस अधिकारी डोळा ठेवून वाट बघत आहे. त्याच अधिकार्याने या नेत्याचा पूर्ण बंदोबस्त केला असल्याचे समजते. या राक्षसरूपी नेत्याला जेलवारी होणार अशी व्यवस्था केली आहे तर त्या मुलीच्या हत्या संदर्भातील अनेक पुरावे त्याच पोलीस अधिकाऱ्याच्या जवळ सुरक्षित असल्याचे समजते.

शहरात अचानक घडलेल्या या हत्येच्या घटनेने अनेकांना अचंभित करून टाकले, कारण घटनाही तसीच होती एका बाहेर राज्यातील मुलगी आपल्या शहरात येऊन तिची हत्या होते अनेकांना न पटणारी गोष्ट आहे. जेव्हा ही मुलगी शहरात आली तेव्हा अनेकांच्या निदर्शनास ही पडली हिला शहरात कोणी आणलं? आणि कशासाठी आणले? हे अनेकांना कळून चुकलं गुप्त माहितीच्या आधारे या मुलीचा उपयोग घेतल्यानंतर त्या मुलीला ठार केले असल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जाते. तर त्या मुलीच्या हत्या एका अद्यात ठिकाणी करून तिला त्या बार मालकाच्या घरात ठेवले असेल अशीही गुप्त माहिती मिळत आहे. हि बाब त्या बार मालकाला कदाचित माहिती असेल, तर त्या मुलीला ज्या ठेकेदारांनी त्या नेत्याच्या शौकासाठी आणलं होत, त्याच्यानंतर काय काय प्रकार झाले याबाबत सविस्तर माहिती एका पोलिस अधिकाऱ्याला चांगलीच ठाऊक आहे. या हत्याकांडात ज्याचा ज्याचा सहभाग असेल तो कोणीच सुटणार नाही. या नेत्याने पैश्याच्या जोरावर हे प्रकरण दाबलं जरी असल तरी हि हत्या या नेत्यानेच घडवून आणली अशी चर्चा शहरात सुरु आहे.

या प्रकरणाचे पडसाद या निवडणुकीत उमटणार असल्याने काही खास कार्यकर्त्यांनी या नेत्यापासून आतापासूनच दूर व्हायला सुरुवात केली असून काही महिला पदाधिकारी सुद्धा यांच्या टीम पासून दुरी ठेवत असल्याचे समजते. कारण यांच्या नादाला लागून अनेकांचे संसार उध्वस्त झाले असल्याचे अनेक उदाहरण आहेत. तर कोणताही इज्जतदार घरचा व्यक्ती आपल्या बायकोला स्वताहून त्याच्या कडे पाठवणार नाही. या राक्षसी नेत्याने कोणालाच सोडले नसून स्वतच्या जवळच्या नातेवाईकाचा सुद्धा उपभोग घेतला असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. तर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातून जाता जाता याचा पूर्ण बंदोबस्त करून तो निघून गेला आहे तर या प्रकरणातील संशयित आरोपी अजून फरार असल्यामुळे या प्रकरणाचा खुलासा होणार नाही मात्र तो आरोपी कुठे आहे हे त्या अधिकाऱ्याला चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे जेव्हा अशी वेळ पडेल तेव्हा तो अधिकारी त्या संशयित आरोपीला बाहेर काढणार असल्याचे समजते. जेव्हा संशयित आरोपी बाहेर येईल तेव्हाच या नेत्याचं बिंग फुटेल आणि हा नेता किती खालच्या स्तराचा आहे हे आपणाला माहित पडेल…पुढील लेखात त्या महिला डॉक्टरच्या हत्ये बद्दल आणि या नेत्याने प्रकरण कस दाबल ते पाहूया…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: