मूर्तिजापूर : विध्यार्थी दशापासून आंबेडकर चळवळीत भाग घेणारे तसेच रा.सु.गवई यांचे खंदे समर्थक शामरावजी खांडेकर गुरुजी यांचे आज वयाच्या 80 व्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. उद्या मूर्तिजापूर भटोरी रोड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे.
शामराव उर्फ भाऊसाहेब खांडेकर जन्म 7 नोव्हे 1945 या वर्षी झाला, त्याचं मुल गाव दताळा, समाज कार्यासाठी नेहमी तत्पर असणारे खांडेकर गुरुजी काही महिन्यापासून आजारी होते. शेवटचा स्वास असे पर्यन्त समाजासाठी कार्य करत राहायचं मात्र काही महिन्यांपूर्वी आजाराने ग्रासल्याने घरीच उपचार घेत होते आज शेवटी त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांनी शिक्षकी पेशामध्ये नगरपरिषद येथे शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आणि निवृत्ती राजकीय क्षेत्रात रिपब्लिकन ऑफ इंडिया रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (गवई गट) अकोला जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी बरेच वर्ष काम केले तसेच मूर्तिजापूर शहरातील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्थापन करताना समिती अध्यक्ष, समितीचे महत्त्वाचे भूमिका भाऊसाहेब खांडेकर यांनी बजावली सोबतच शांतता कमिटी पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर बऱ्याच वर्ष त्यांनी अध्यक्षपद भूषविले व मूर्तिजापूर शहरांमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावे याकरिता सतत तडजोडीची भूमिका करत निपटारा करणे हे महत्त्वाचं त्यांचं एक मुख्यशस्त्र त्यांनी समाजामध्ये अंगीकारलं असे समाजातील सामाजिक महामेरु, अष्टपैलू असलेला बहुगुणी व्यक्तिमत्व आपल्यातून आज हरपलं.
त्यांची अंतयात्रा उदया सकाळी 10.30वाजता त्यांचे निवासस्थान त्रिमुर्ती नगर गोरक्षण जवळ येथुन निघून भटोरी रोड वरील स्मशानभूमी, मुर्तिजापूर येथे करण्यात येईल. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलं एक मुलगी असा आप्त परिवार आहे.