मूर्तिजापूर तालुक्यातील नदी लगतच्या नाल्यातुन सर्रास रेतीचा उपसा सुरु असून लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेचा फायदा घेत लाखो रुपयांची रेतीची तस्करी या चोरट्यांनी केली आहे.
हे रेती चोर नाल्यातून दिवसाढवळ्या जेसीबीच्या साह्याने रेतीचा उपसा सुरू केला आहे. तर आता महसूल अधिकारी पुन्हा कामावर परत आल्याने रेती चोर सावध भूमिका घेत काही प्रमाणात चोरीला आळा बसेल.
शासनाने रेतीच्या तस्करीला आळा बसावा म्हणून तालुक्यात रेती डेपो उभारले, येथूनच शासनाच्या निगराणी खाली रेती विक्री केल्या जात असल्याने रेती माफियाचे हात बांधल्या गेल्याने अवैध मार्ग शोधून रेतीतुन मोठा पैसे कमावता येईल.
यासाठी एकाच शासनाच्या रॉयल्टीवर तीन चार ट्रीप सुरू असल्याचे निदर्शनास आले असून हे बहाद्दर महसूल अधिकाऱ्याला हाताशी धरून हा गैरप्रकार सुरू असल्याचे महाव्हाईस च्या सूत्रांनी सांगितले. हीच परिस्थिती घुंगशी घाटावरची सुद्धा असल्याचे सांगण्यात येते.