काल मुर्तिजापूर तालुक्यात पावसाने चांगलेच झोडपल्याने संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होत. तालुक्यातील अनेक गावाला या पावसाचा चांगलाच फटका बसला, या पावसामुळे गोरगरिबांच्या घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. तर तालुक्यातील दुर्गवाडा या गावातही गोरगरिबांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सदर घटनेची माहिती समाज सेवक व नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावणारे सम्राटभाऊ डोंगरदिवे यांना माहिती मिळताच दुर्गवाडा गावात पोहचले आणि तेथील गोरगरिबांना आर्थिक मदतीचा हात देवून त्यांना शासनाची मदतही मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
मागील वर्षी 2023 जुलै मुर्तिजापूर तालुक्यातील खरब ढोरे गावात पुराचे पाणी घुसले होते तेव्हा सर्वात आधी सम्राटभाऊ डोंगरदिवे हे पोहचले आणि तेथील पूर पिडीताना मदतीचा हात देत टीन पत्र्यासह आर्थिक मदत केली होती. तर कालच्या पावसामुळे दुर्गवाडा गावातील झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच सम्राटभाऊ डोंगरदिवे यांनी प्रत्येकी कुटुंबाला ६ हजार रुपये प्रमाणे नगदी मदत केली.