Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsमूर्तिजापूर | राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी सम्राट डोंगरदिवे यांनाच...

मूर्तिजापूर | राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी सम्राट डोंगरदिवे यांनाच…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपली पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये ४५ उमेदवारांची नावे आहेत तर उर्वरित उमेदवारांची यादी उद्या पर्यंत जाहीर होणार असल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. तर अकोला जिल्ह्यातील चर्चित असलेला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी दिल्याने आता या मतदारसंघात तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. तर भाजपचा उमेदवार अद्याप निश्चित नसल्याने विद्यमान आमदार यांची वर्णी लागत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

मात्र या मतदारसंघात आता भाजप नवखा चेहरा देणार असल्याचे राजकीय सूत्र सांगतात मात्र आता अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बाजू मजबूत झाली असल्याचे राजकीय तज्ञांची मते आहेत. तर सम्राट डोंगरदेवे हे मूर्तिजापूर मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत असून त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढून आणि आपली एक वेगळी छाप पाडून लोकांपर्यंत पोहोचलेले पहिले उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांची यावेळी या मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकीत रवी राठी यांना 42000 पेक्षा जास्त मतांनी मते मिळाली मात्र निवडून येण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसल्याने त्यांना यावेळी पक्षाने डावल्याची राजकीय तज्ञ सांगतात. तर सम्राट डोंगरदिवे यांनी गेल्या अडीच तीन वर्षात मतदार संघाचा कामाचा सपाटा लावला असून त्याचा फायदा त्यांना येत्या निवडणुकीमध्ये होणार असल्याचे समजते तर सम्राट डोंगरदिवे एवढा बलाढ्य कोणताही उमेदवार नसल्यामुळे त्यांचा विजय आज निश्चित मानले जात आहे.

वाचा उमेदवारांची यादी
इस्लामपूर – जयंत पाटील
काटोल – अनिल देशमुख
घनसावंगी – राजेश टोपे
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
कोरेगाव – शशिकांत शिंदे
बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
इंदापूर – हर्षवर्धन पाटील
राहुरी – प्राजक्त तनपुरे
शिरुर – अशोक पवार
शिराळा – मासिंगराव नाईक
विक्रमगड – सुनील भुसारा
कर्जत – जामखेड – रोहित पवार
अहमदपूर – विनायकराव पाटील
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
उदगीर – सुधाकर भालेराव
भोकरदन – चंद्रकांत दानवे
तुमसर – चरण वाघमारे
किनवट – प्रदीप नाईक
जिंतूर – विजय भामरे
केज – पृथ्वीराज साठे
बेलापूर – संदीप नाईक
वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
जामनेर – दिलीप खोडपे
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
मूर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
नागपूर पूर्व – दिनेश्वर पेठे
किरोडा – रविकांत गोपचे
अहिरी – भाग्यश्री आत्राम
बदनापूर – बबलू चौधरी
मुरबाड – सुभाष पवार
घाटकोपर पूर्व – राखी जाधव
आंबेगाव – देवदत्त निकम
बारामती – युगेंद्र पवार
कोपरगाव – संदीप वरपे
शेवगाव – प्रताप ढाकणे
पारनेर – राणी लंके
आष्टी – मेहबूब शेख
करमाळा – नारायण पाटील
सोलापूर शहर उत्तर – महेश कोठेे
चिपळूण – प्रशांत यादव
कागल – समरजीत घाटगे
तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील
हडपसर – प्रशांत जगताप

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: