Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayमूर्तिजापूर | मुस्लीम भावंडांची कायद्याच्या क्षेत्रात उंच भरारी...

मूर्तिजापूर | मुस्लीम भावंडांची कायद्याच्या क्षेत्रात उंच भरारी…

मूर्तिजापूर : येथील प्रतिष्ठीत नागरिक,समाजसेवक व माजी नगरसेवक, किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इब्राहीम घाणीवाला यांची मुलगी शिफा व मुलगा रजा या दोघांनीही आपापल्या सेटल्ड करीअरच्या बाहेर जाऊन कायद्या (एलएलबी) ची पदवी प्राप्त केली असून मुस्लीम समाजातील या भावंडांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आधीच पदव्यूत्तर पदवी धारण करणाऱ्या शिफा हिने आपल्या एलएलबी चे श्रेय तिच्या वडीलांना दिले आहे व इस्लामिक स्टडीज मध्ये तिला मास्टर्स डिग्री मिळवायची आहे. मनात आणलं तर तुम्ही इतरांसाठी रोल मॉडेल बनु शकता असा सल्ला तिने मुस्लीम समाजातील मुलींना दिला आहे.

बांधकाम अभियांत्रिकीची पदवी घेऊन बांधकाम क्षेत्रात कार्यरत रजा याने आवड म्हणून एलएलबी केले असून तांत्रिक क्षेत्रातून कायद्याच्या क्षेत्रात येणे आव्हानात्मक होते, मात्र कठोर परीश्रमाने ते साध्य केल्याचे सांगून यशाचे श्रेय कुटुंबियांना दिले. शिस्तबद्ध नियोजन तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात सहज यश मिळवून देईल, असा सल्ला त्यांनी युवकांना दिला.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: