Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayमूर्तिजापूर | राष्ट्रवादी (शप)च्या अतिउत्साही कार्यकर्त्यांचा प्रताप...प्रचार करण्याच्या नादात केली महाराजांच्या प्रतिमेची...

मूर्तिजापूर | राष्ट्रवादी (शप)च्या अतिउत्साही कार्यकर्त्यांचा प्रताप…प्रचार करण्याच्या नादात केली महाराजांच्या प्रतिमेची अवेहेलना…

मूर्तिजापूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोर पकडत आहे. अशातच मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात सध्या प्रचाराची चढाओढ सुरू आहे तर राष्ट्रवादीच्या अति उत्साही कार्यकर्त्यांनी चक्क शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेवर चिन्हाचे पोस्टर लावल्याचा संताप जनक प्रकार मतदार संघातील कारली या गावात घडून आला. यामुळे काही वेळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्या समाजाच्या भरवश्यावर निवडून येण्याची आस ठेवणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आता मोठ्या प्रमाणात विरोध होतांना दिसत आहे.

तालुक्यातील कार्ली या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( श. प) च्या उमेदवाराकडून चक्क श्री छत्रपती शिवाजी महाराजांची अवेहेलना झाल्याचा संताप जनक बाब समोर आली आहे. या मुळे मात्र गावात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येत असलेल्या मुर्तीजापुर तालुक्यातील कार्ली या गावात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर चेहऱ्यावर पक्षाचे चिन्ह असलेले स्टिकर चिपकून अवमान झाल्याचा संताप जनक प्रकार घडलाय. यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सद्या राज्यात विधानसभेचे वारे वाहत असतांना मुर्तीजापुर विधानसभेची चर्चा राज्यात गाजत आहे. या विधानसभा मतदारसंघाकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागले असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प) गटाचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क कारली या गावात असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या प्रतिमेवर पक्षाचे तुतारी चिन्हांचे स्टिकर लावल्याने शिवप्रेमींकडून मोठया संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. एकीकडे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागायचे आणि त्यांच्याच प्रतिमेचा अवमान करायचा हे कुठलं राजकारण..? अशाप्रकारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे असो अथवा कुठल्याही महापुरुषांची विटंबना आम्ही सहन करणार नाही अशांना निवडणुकीत आम्ही घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया कार्ली वासियांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: