मूर्तीजापुर व दर्यापूर तालुक्याच्या वेशीवर पूर्णा नदी तीरावर तीर्थक्षेत्र लाखपुरी ता. मूर्तिजापूर जि. अकोला येथे सोमवार रोजी सोमवती अमावस्या निमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी आलेली सोमवती अमावस्या निमित्त आपल्या पूर्वजांना मिळवण्याचा विधी पार पाळण्याकरिता पश्चिम विदर्भातील असंख्य भाविक आज तीर्थक्षेत्र लाखपुरीत आले होते.
नदी तीरावर विधी उरकून भगवान लक्षेश्वराचे दर्शन घेऊन भाविक समाधान व्यक्त करीत होते. संस्थान तर्फे करण्यात आलेली व्यवस्था व संस्थानचा होत असलेला विकास बद्दल अनेक भाविकांनी संस्थानच्या प्रतिक्रिया वहीत समाधानकारक नोंद केली.
दिवाळीचा सण असताना सुद्धा संस्थानचे सेवाधारी महादेव ढाकरे ,प्रमोद अवघड , देविदास चव्हाण , दत्ता गव्हाळे , कैलास तामसे, नाना मेहर, दिलीप सुरदुसे, तुळशीराम वरणकर,गुड्डू शर्मा, पवन महाराज, मंगलसिह मुगोना, प्रमोद तामसे, गुलाब चौहान, प्रवीण सुरदुसे व युवा सेवाधारी यांनी भाविकांसाठी पिण्याचे पाणी, मंडप, पार्किंग व प्रसाद व्यवस्था केली. सोमवती निमित्त अनेक पंडित व न्हावी नदी तीरावर उपस्थित होते.
स्वच्छतेची जबाबदारी श्री लक्षेश्वर महिला सेवाधरी मंडळाने पार पाडली. यात्रे निमित्य मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक मा. सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त होता अशी माहिती श्री लक्षेक्ष्वर संस्थानचे अध्यक्ष राजु दाहापुते यांनी दिली .