Sunday, December 22, 2024
Homeकृषीमूर्तिजापूर | अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या…

मूर्तिजापूर | अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या…

मूर्तिजापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये फळबाग, भाजीपाला, पिकासह कपाशी तूर चना कांदा यांचा समावेश असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थीक ढासळलेली आहे, त्या अनुषंगाने आपल्या स्थरावरुन संबंधीत अधिकाऱ्यांना पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबद्दल आदेश देऊन संबंधीत मुर्तिजापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थीक मदत देण्यात यावी यासाठी मूर्तिजापूर तालुकातील शेतकरी व अकोला जिल्हा शेतकरी संघटना तसेच विदर्भ आंदोलन समितीच्या वतीने मूर्तिजापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी अकोला शेतकरी संघटनेचे सुरेश जोगळे, गुलाबराव पाटील म्हसाये, अरविंद तायडे, रवींद्र ठाकरे, शरद सरोदे, पंकज वानखेडे, मोहन इंगळे, योगेश हरणे, अकुश सरोदे, मोहन इंगळे, बाळासाहेब ठोकळ, बाळासाहेब खांडेकर. प्रदीप ठाकरे, साबुद्दिन यांनी निवेदन दिले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: