मूर्तिजापूर -: शेतकरी संघटना तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने 75%पीक विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावे .
करीता मा. तहसीलदार यांना निवेदन खरीप पिकांचे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैश्याची जुळवाजुळव करावी लागत आहे. परंतु मागील काही दिवसांपुर्वी 25% विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली होती.
परंतु पीकविमा विमा कंपनीने अद्याप राहिलेली 75%टकके विमा कंपनीने जमा केलेला नाही व शेतकरी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून राहिलेल्या पैश्या बाबत विचारणा केल्यावर कंपनीच्या अधिकाऱ्याकडून उडवा उडविचे उत्तर देण्यात येते व फोन केला तर उचलत नाही अशी भूमिका पिकविमा कंपनी करीत आहे तरी आपल्या कार्यालयाकडून पेरणी पुर्वी पीक विमा कंपनीने जमा करावं करीता आपल्या कार्यालया कडून तात्काळ कारवाई करण्यात यावी करीता आपणास निवेदन सादर करण्यातयेत आहे. जर शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने जमा न केल्यास शेतकरी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देत आहे. मा. सुरेशभाऊ जोगले.
जिल्हा अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष तथा विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा अकोला.मा. गुलाबराव पाटील म्हासाये. अरविंद तायडे, शरद सरोदे, पंकज वानखेडे, रवींद्र ठाकरे, रामचंद्र तायडे, बाळु भागत, वामन वानखेडे, नंदू पाटील, दिपक अनभोरे, बबन तायडे, अनिल डाहेलकर, प्रदीप डांगे. गोपाल तायडे, बरेच शेतकरी उपस्थित होते.