मूर्तिजापूर मतदार संघात कालपासून एक वेगळाच वाद समोर येत आहे. एका पक्षातील मोठ्या नेत्याचा उद्दामपणा पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या जिव्हारी लागत आहे. मूर्तिजापूर मध्ये सध्या एका पक्षात उमेदवाराच्या निवडीबाबत वरिष्ठ पातळीवर संभ्रम सुरू आहे आणि मूर्तिजापूरतील या मोठ्या नेत्याचा तिकीट पक्षाने कापल्यातच जमा आहे. ही बाब मतदार संघातील सर्व लोकांना माहित पडली आहे. परंतु सदर पक्षाच्या काही जिल्ह्याबाहेरील नेत्यांनी वरच्या लेव्हलवर फिल्डिंग लावून नवीनच उमेदवाराचा जो दुसऱ्या पक्षातून हाकलल्या गेला आहे. अश्या उमेदवाराला पक्षात प्रवेश करून घेऊन त्याला तिकीट देण्याचा घाट घातला जात आहे. याला मूर्तिजापूर मतदारसंघातील पक्षातीलच कार्यकर्त्यांचा विरोध सुरू झाला आहे व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला असून अशावेळी त्याच पक्षातील या मोठ्या नेत्याने याला संधी समजून पुन्हा स्वतःचे नाव रेटून कसे तरी करून आपल्या पदरात तिकीट पाडण्याचा प्रयत्न चालविला आहे.
या नेत्यानी स्वतःच पोचलेले संघटनेतील तथाकथित कार्यकर्ते व बूथ प्रमुख यांना सोशल मीडियावर व जिल्ह्यातील नेत्यांना संपर्क करून राजीनामे देण्याची धमकी द्या असे म्हणत परत याच नेत्याला तिकीट मिळालं पाहिजे याकरिता पक्षात गोंधळ निर्माण केलेला आहे. स्वतः चांगलं बनण्याकरिता हा नेता शेगावला जाऊन बसल्याचेही समजत आहे. कालपर्यंत हा नेता जिल्ह्यातील व प्रदेशावरील महत्त्वाच्या नेत्यांना तिकीट कापलं म्हणून बेधुंद अवस्थेत एका गुप्त ठिकाणी बसून शिवीगाळ करीत होता. परंतु काल संध्याकाळपासून निर्माण झालेल्या परिस्थितीला संधी समजून पक्षाच्या अशा संवेदनशील वेळी मदत न करता व सहकार्यांना करता पक्षाशी निष्ठां न दाखवता स्वतःच्या स्वार्थाकरिता या स्थितीचा फायदा उचलण्याच्या उद्देशाने जिल्हा पातळीवर व प्रदेश पातळीवर स्वतःच्या पोसलेल्या लोकांच्या माध्यमातून पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न याने सुरू केला आहे.
याच्याच गुप्त आदेशामुळे पक्षातील संघटनेच्या प्रस्तावित सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहे. परंतु या नेत्याकरिता तिकीट परत मिळवण्यासाठी बैठका मात्र सुरू आहे. त्यामुळे एवढ्या अनुशासित पक्षांमध्ये एका व्यक्तीच्या स्वार्थापुढे व लालसे पोटी पक्षात गोंधळ निर्माण झाल्याची स्थिती आहे ते सामान्य नागरिक पक्षावर प्रेम करणारे लोक यांना वेदना पोहोचवत आहे व या तिकीट कटलेल्या नेत्या विषयी अधिक रोष व राग निर्माण करत आहे. तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाले असून तरी प्रयत्न मात्र सुरूच आहेत. ऐनवेळेवर पक्ष कोणाच्या डोक्याला बाशिंग बांधणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.