Monday, December 23, 2024
Homeराजकीयमूर्तिजापूर पंचायत समितीवर वंचितचा झेंडा...आम्रपाली तायडे सभापती तर उपसभापती देवाशीष भटकर...

मूर्तिजापूर पंचायत समितीवर वंचितचा झेंडा…आम्रपाली तायडे सभापती तर उपसभापती देवाशीष भटकर…

मूर्तिजापूर – अर्जुन बलखंडे

Murtizapur News – मूर्तिजापूर पंचायत समिती सभापती – उपसभापती पदाची निवडणूक पंचायत समिती सभागृहात आज १६ अॉक्टोबर रोजी पार पडली. बंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडीतील पक्षीय बलाबल समान असले तरी शिवसेनेचे दोन सदस्य वंचितच्या गळाला लागल्याने समीकरण बदलले;

यामध्ये सभापती पदासाठी वंचितच्या आम्रपाली तायडे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्या बिनविरोध सभापती झाल्या तर उपसभापती पदासाठी शिवसेनेचे देवाशीष भटकर व राष्ट्रवादीच्या जया तायडे यांनी अर्ज भरले होते परंतु वंचितकडे संख्यावळ ९ झाल्याने देवाशीष भटकर हे ९ विरुद्ध शुन्य मतांनी विजयी झाले.

पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभापती – उपसभापतीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही निवडणूक घेण्यात आली आहे परंतु वंचित कडे व महाविकास आघाडीकडे समान ७-७ सदस्य संख्या असल्याने औत्सुक्य वाढले होते, दरम्यान आघाडीत बिघाडी झाल्याने आता सभापती पद वंचित कडे तर उपसभापती शिवसेनेला मिळाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: