मूर्तिजापूर शहरातील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ. राजेश कांबे यांची सून काजल संकेत कांबे (24) हिने दिनांक 20 जून रोजी रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणाला बरेच दिवस दिवस उलटून गेले तरी अजूनही कारवाई होत नसल्याने काजल शर्मा यांच्या कुटुंबीयाने पत्रकार परिषद घेत आपली व्यथा मांडली व सौ. काजल हिला न्याय मिळावा यासाठी मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. यावरही जर न्याय मिळाला नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शर्मा परिवार यांनी दिला आहे.
शर्मा कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनात म्हटले कि, कु. काजल संजय शर्मा लग्नानंतर चे नाव सौ. काजल संकेत कांबे रा. रेल्वे गेट क्रॉसिंग जवळ हिचे लग्न ५ वर्ष पूर्वी संकेत राजेश कांबे यांचा सोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवस सुखाचे गेले या दरम्यान सौ. काजल हिला दोन मुले देखील झाली. माझ्या ऐपती नुसार मी कांबे यांना मुलीच्या सुखाकरिता जे द्यायचे होते ते दिले, परंतु त्याची मागणी मोठी होती ती मी पुर्ण करू शकलो नाही. त्यामुळे संकेत सह त्याचे कुटुंबीय त्रास देवून छळ करीत होते. या बाबत तिने तिच्या आईला कल्पना दिले होते मात्र प्रत्येकाच्या घरात लहान सहान कुरबुरी घडतच असतात त्यामुळे आईने घरातील इतरांना सांगितले नाही.
मात्र तिला त्रास दिवसेदिवस वाढतच होता. हाच छळ व त्रास असाहय झाल्याने तिने आपल्या दोन चिमुकल्या मुलांची कोणतीही पर्वा न करता मातृत्वाचा गळा घोटून दि. 20 जुन 2023 रोजी रेल्वे समोर उडी घेऊन जीवनयात्रा संपविली.
एवढी मोठी घटना घडल्यानंतर देखील संकेत व त्यांच्या कुटुंबीयांना मात्र कुठलेही दुखः झाल्याचे दिसून आले नाही. या बाबत आम्ही मुर्तीजापूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. परंतु कारवाही मात्र अत्यंत संथ गतीने सुरु आहे. मृतक सौ. काजल हिला न्याय मिळावा करिता दि. 12/07/2023 रोजी जुन्या शहरातील श्री. स्वामी समर्थ मंदिर येथून सकाळी 10 वाजता मूक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत काढण्यात येणार आहे. यानंतर देखील न्याय न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.