Sunday, December 22, 2024
Homeराजकीयमूर्तिजापूर | आमदार हरीश पिंपळे आणि डॉ. सुगत वाघमारे यांचं वाढतं प्रस्थ…

मूर्तिजापूर | आमदार हरीश पिंपळे आणि डॉ. सुगत वाघमारे यांचं वाढतं प्रस्थ…

मूर्तिजापूर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला खरी सुरुवात दोन दिवसापासून झाली आहे. या प्रचारामध्ये कोण पुढे आणि कोण मागे राहणार याबाबत सविस्तर वृत्तान्कन दररोज या महाव्हाईस न्यूज वर मिळणार आहे. त्यापूर्वी या मतदारसंघातील सध्या काय स्थिती आहे ते पाहूया.

गेल्या पंधरा वर्षापासून आमदार असलेल्या हरीश पिंपळे यांच्या बद्दल मतदारांमध्ये असलेली नाराजी स्वतः हरीश पिंपळे दूर करत असल्याचे समजत आहे. यासोबतच त्यांचे जेवढेही बूथ प्रमुख आहेत तेही कामाला लागले आहेत आणि पिंपळे यांच्या बद्दल असलेली नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पिंपळे यांचे मतदार पुन्हा त्यांच्याकडे पुन्हा वळले असल्याचे काही जन सांगतात. सोबतच भाजपचे जे नाराज असलेले पदाधिकारी यांनीही आता पिंपळे बद्दल नाराजीचे सूर बंद केले असल्याचेही समजत आहे. त्यामुळे पुन्हा कामाला लागा अशी सूचना वरिष्ठांनी आपल्या नाराज पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे पिंपळे त्यांची स्थिती सध्या तरी ठीकठाक म्हटली जात आहे. जे पिंपळे बद्दल मतदारांमध्ये नाराजीचा सूर होता तो सूर आता बदलत आहे. शेवटी ‘आपला भोळा भाबडा बरा’ अशी चर्चा मतदारांमध्ये सुरु आहे. गेले काही दिवसांपासून एका विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराने भाजपच्या मतदारांना आमिष दाखवून आपल्याकडे केले होते. आता तेच मतदार आता त्या उमेदवाराबद्दल उलट सुलट बोलत आहेत. तो उमेदवार कितीही हवेत असला तरी तो पिंपळे यांचे मतदान घेवू शकत नाही. सोबतच तो उमेदवार ज्या समाजातून येतो ते मतदान तर अजिबात मिळणार नसल्याचे राजकीय तज्ञ सांगतात.

सुरुवातीला पिंपळे आपलं डॅमेज कंट्रोल कसं करतात की याच्या लोकांना मन धारणी करण्यात त्यांचा वेळ जाणार असे चित्र होतं मात्र आता थोडं चित्र बदलत असल्याचे दिसत आहे. या मतदारसंघात असलेला मराठा समाज हा आजही पिंपळे यांच्या पाठीशी असल्याचं बोलले जाते तर एवढेच नाही तर इतरही ओबीसी समाजाचे समाजातील काही मतदार पिंपळे यांच्या पाठीशी असल्यामुळे पिंपळे यांची सध्याची स्थिती ठीकठाक वाटत असल्याचं दिसत आहे. आता यावर पिंपळे स्वतः लोकांचे संवाद साधून कसं लोकांना जवळ करतात व दूर गेलेल्या लोकांना कसं जवळ करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जेवढे लोक ते जवळ करतील तेवढा त्यांचा लीड वाढणार असल्याचं बोलल्या जाते.

याच मतदारसंघातील दुसरे चर्चित असलेले उमेदवार जे छुप्या पद्धतीने दूर गेलेल्या समाज समाजाला अगदी सहजपणे जवळ करून आपला स्थिती भक्कम करण्याचे काम करत आहेत, एवढेच नाही तर इतरही समाजातील ओबीसी सर्वात मोठा समाज असलेला मुस्लिम समाजही आता त्यांच्याकडे वळविण्यात त्यांना यश आला आहे. त्यामुळे डॉक्टर सुगत वाघमारे यांची स्थिती सध्या चांगली म्हटल्या जात आहे . डॉक्टर सुगत वाघमारे आणि हरीश पिंपळे यांच्यातच लढत होणार असल्याचेही काही लोकांचं म्हणणे आहे. डॉक्टर सुगत वाघमारे हा राजकारणातील नवीन चेहरा असल्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत आहे आणि अजिबात खोटे आश्वासन नाही, पैशाचे आमिष नाही आणि जिल्ह्यातील सर्वात मोठा बिल्डर असूनही अजिबात कवडीचाही घमंड नाही. अशा व्यक्तीने आपल्या स्वभावाने आपला समाज जवळ केला आणि इतर समाज असे जवळ करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे त्यामुळे डॉक्टर सुगत वाघमारे ही सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत.

सोशल मीडियावर वोटिंग बोल च्या नावावर काही उत्साही कार्यकर्ते आपल्याच कार्यकर्त्यांना पोलची लिंक पाठवून त्यांना मतदान करायला लावतात आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला मतदान करायचं असे सांगतात, ते खोटे पोल सोशल मीडियावर फिरवतात त्यामुळे आपल्या मर्जीतील उमेदवार हा पुढे चालला आणि प्रतिस्पर्धी उमेदवार खाली चालला हे असं सहजपणे सोशल मीडियावर दाखवतात ज्याच्यामुळे ज्या नेत्यांचे उमेदवारांचे कार्यकर्ते ग्राउंड लेव्हलवर चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांचा उत्साह कमी करण्यासाठी या अशा योजना तयार केल्या जातात. मात्र या पोलमध्ये काही तथ्य नसून नुसतं आपल्या स्वतःच्या समाधानिसाठी केलेल्या तो एक सर्वे आहे. त्यामुळे अशा सर्वांना बळी पडू नका आणि मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात चांगल्या उमेदवाराला निवडून आणा…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: