मुर्तिजापूर
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत “माझी माती माझा देश” अभियान अंतर्गत दिनांक ०९ ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन नगर परिषद मुर्तिजापूर येथे करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने आज दिनांक १०/०८/२०२३ गुरुवार रोजी मा. आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे यांचे हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार भैय्यासाहेब तिडके तर प्रमुख अतिथी म्हणून मनोहर दाभाडे उपविभागीय पोलिस अधिकारी, मोनालिताई गावंडे माजी नगराध्यक्षा, सुप्रिया टवलारे प्रशासक तथा मुख्याधिकारी, शहरातील माजी सैनिक व त्यांचे कुटुंबातली सदस्य, सर्व माजी नगर सेवक पदाधिकारी, शहरांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलीदान दिले आहे अश्या थोर व्यक्तींच्या नावाचे शिलाफलकाचे अनावरण दीपप्रज्वलन व पुष्पचक्र अर्पण करून प्रमुख अतिथी यांचे हस्ते करण्यात आले.त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक व विराना वंदन उपक्रमांतर्गत संरक्षण दल,पोलीस दलातील शहिदांच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा तसेच आजी/माजी सैनिकांचां स्थानिक पारंपारिक पद्धतीने शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला.
उपस्थित सर्व शहरवासियानी हातात मातीचे दिवे घेऊन पंचप्रण शपथ घेतली. यावेळी बचत गटाच्या माध्यमातून मातीचे दिवे तयार करून त्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. दिनांक ९ ते १५ ऑगस्ट या दरम्यान आयोजीत उपक्रमांची माहिती आपल्या प्रास्ताविकात सुप्रिया टवलारे यांनी दिली व मागील वर्षीप्रमाणे दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत हर घर तिरंगा हा कार्यक्रम राबवयाचा असून प्रत्येक घरोघरी राष्ट्रिय ध्वज फडकविने व ध्वजसंहितेचे पालन करण्याबाबत मुख्याधिकारी यांनी जनतेला आवाहन केले. तर मा. आमदार हरिष पिंपळे यांनी माजी सैनिक यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या पूर्ण करण्याची ग्वाही आपल्या भाषनातून दिली. तर अध्यक्षीय भाषणात माजी आमदार यांनी या बाबत समाधान व्यक्त केले व नगर परिषद राबवित असलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली.
आजच्या कार्यक्रमाचा समारोप वसुधा वंदन उपक्रमांतर्गत विविध देशी प्रजातीच्या ७५ रोपट्यांची देवरण स्मशानभूमी येथे लागवड करून अमृतवाटिका तयार करून करण्यात आला , यावेळी माजी सैनिक , प्रमुख अतिथी, बचत गटाच्या सदस्यांनी वृक्षारोपण केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश भुगुल सहा प्रकल्प अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन चित्रा हनुमंते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदन अग्रवाल, उपमुख्याधीकारी अमोल बेलोटे, निशिकांत परळीकर, संकेत तालकोकुलवार, पुरुषोत्तम पोटे, प्रसाद सुर्यवंशी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक , नितीन शिंगणे, सुनील सरोदे, विलास ठाकरे, अमोल तायडे, यांनी सहकार्य केले.