Tuesday, October 15, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर | न्यायालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात पत्रकारांना बसवले शेवटच्या रांगेत

मूर्तिजापूर | न्यायालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात पत्रकारांना बसवले शेवटच्या रांगेत

मूर्तिजापूर :आज रोजी ६ ऑक्टोबरला मूर्तिजापूर येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम पार पडला त्या अनुषंगाने सालासार रिसोर्ट मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मात्र लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या न्यायमंळाने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सर्वात शेवटच्या रांगेत बसविण्यात आल्याने अवमान झालेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकत सभागृहातून बहिर्गमन केले.

मोठ्या थाटामाटात कार्यक्रमाचे आयोजन वकिल संघाला पुढे करून आयोजन याच इमारतीच्या बांधकाम ठेकेदाराने केले असल्याचे समजते. नियोजित पाहुण्यांनाही कार्यक्रमाला हजेरी लावली, मात्र कार्यक्रमस्थळी सर्व सामान्य नागरीक पहिल्या दुसऱ्या रांगेत बसल्याचे निदर्शनास आले, लोकशाहीच्या कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंळ आणि प्रसार माध्यमे ही चार आधारस्तंभ असताना एका स्तंभाने दुसऱ्या आधारस्तंभाचा अवमान केल्याने संतापजनक प्रतिक्रिया प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.

न्यायालयच्या नियोजित इमारती संदर्भात उपस्थितांनी संशय व्यक्त केला असून इमारतीला दिलेल्या कमानी या मोगलकालीन असल्याची चर्चा होती, आर्किटेक कोण असावा हाही संशोधनाचा विषय आहे, गाजावाजा करुन करण्यात आलेल्या कार्यक्रमात म्हणावी तशी नागरिकांची उपस्थिती नगण्य होती.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: