सात सुवर्णपदकासह सहा रौप्य पदकांची कमाई
मूर्तिजापूर – नागपूरच्या शतकोन कराटे इंडियन नॅशनल फेडरेशन यशोदा विहार कराटे क्लब येथे आयोजीत राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मूर्तिजापूरच्या एम बी कराटे क्लासच्या खेडाळूनी घवघवीत यश मिळवत सात सुवर्णपदकासह सहा रौप्य पदकांची कमाई केली आहे.
सदरची राज्यस्तरीय कराटे स्पर्धा मोठ्या उत्साहाने पार पडली यामध्ये अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील एम बी कराटे क्लासचे संचालक सेसंई गंगाधर जाधव यांच्या मार्गदर्शनासह उपस्थितीत खेडाळूंनी सहभाग नोंदवून आपल्या कौशल्याचे उत्तम सादरीकरण करत सात सुवर्ण व सहा रौप्य पदकांची कमाई केली आहे.
या यशाबद्दल खेळाडूंचा थाई बॉक्सिंग असोसिएशन अमरावती विभागीय अध्यक्ष सम्राट डोंगरदिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर स्पर्धेत सहभागी ऋषभ किसन कोकाटे, कृष्णा नंदकिशोर टिपरे ,अनय राजेश जळमकर , तक्ष वामन इंगळे ज्ञानेश्वरी विठ्ठल सोळंके ,विराट जयभोले भारसाकळे यांनी सुवर्ण पदक मिळवली तर स्मित राहुल ठोकळ , रुद्र निरंजन दुबे, प्रदेश सचिन गावंडे ,अर्थव नवनीत पांण्डेय, स्वरित पंकज सरोदे ,स्मित राहुल ठोकळ यांनी रौप्य पदक मिळविली. या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत असून यशाचे श्रेय आई-वडील ,शिक्षक, प्रशिक्षक सेसंई गंगाधर जाधव यांना देत आहेत.